शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चिमुकलीसह शिक्षिकेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 22:05 IST

एका सहा वर्षीय चिमुकलीसह विधवा शिक्षिकेवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चिमुकलीवर आईवडिलांच्या ओळखीच्याच व्यक्तीने तर विधवा शिक्षिकेवर ‘लिव्ह इन-रिलेशन’ अंतर्गत राहणाऱ्या तरुणाने अत्याचार केला.

ठळक मुद्देजरीपटका-नंदनवन येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका सहा वर्षीय चिमुकलीसह विधवा शिक्षिकेवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चिमुकलीवर आईवडिलांच्या ओळखीच्याच व्यक्तीने तर विधवा शिक्षिकेवर ‘लिव्ह इन-रिलेशन’ अंतर्गत राहणाऱ्या तरुणाने अत्याचार केला.पहिली घटना जरीपटका पोलीस ठाणे अंतर्गत घडली. पीडित सहा वर्षीय मुलीचे आईवडील मजुरी करतात. आरोपी ३० वर्षीय संतोष मरसकोल्हे हा सुद्धा मजुरी करतो. मुलीच्या कुटुंबाशी आरोपी संतोषची ओळख आहे. मंगळवारी दुपारी ४ वाजता आईवडील कामावर गेल्यानंतर संतोष चिमुकलीच्या घरी आला, आणि तो बळजबरी करू लागला. त्याच वेळी मुलीचा मामा घरी आला. त्याने संतोषला पकडले. संतोषने यापूर्वी सुद्धा तिच्याशी असा प्रकार केल्याचे मुलीने सांगितले. मुलीच्या कुटुंबीयांनी जरीपटका पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. संतोषने मुलीला याबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी दिली होती. त्याच्या धमकीमुळे ती दहशतीत होती. ती अनेक दिवसांपासून अत्याचार सहन करीत होती. या घटनेमुळे परिसरातील नागरिकही संतापले आहेत.दुसरी घटना ‘लिव्ह इन रिलेशन’ तुटल्यामुळे उघडकीस आली. आरोपी ३५ वर्षीय सौरभ सिंग आहे. सौरभ हा मूळचा अलाहाबाद येथील रहिवासी आहे. त्याचे वडील सेवानिवृत्त वायुसेना अधिकारी आहेत. पीडित ४१ वर्षीय शिक्षिका आहे. तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे. तिला एक मुलगीही आहे. २०११ मध्ये तिची सौरभसोबत ओळख झाली. थोड्यात दिवसात ते एकमेकांच्या जवळ आले. शिक्षिकेच्या तक्रारीनुसार सौरभने तिला लग्नाचे आमिष दाखविले. यानंतर ते दोघे नंदनवन परिसरात एकत्र राहू लागले. २०११ पासून गेल्या जानेवारी महिन्यापर्यंत सौरभने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.आरोपी सौरभ पूर्वी ट्रान्सपोर्टचे काम करीत होता. या कामात नुकसान झाल्याने त्याने ते बंद केले. अलीकडेच सौरभचे अलाहाबाद येथील एका तरुणीसोबत लग्न ठरले. तो शिक्षिकेला न सांगताच लग्न करण्यासाठी निघून गेला. शिक्षिकेला सौरभच्या व्यवहारावरून संशय आला. संपर्क केल्यानंतरही त्याने शिक्षिकेला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिने नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार