शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभावर शिक्षकांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 21:55 IST

महापालिकेतील शिक्षकांच्या मागण्या मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. वारंवार आश्वासने देण्यात आली. परंतु त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही. याचा निषेध म्हणून महापालिका प्रशासनातर्फे शिक्षक दिनाला आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यावर नागपूर महानगरपालिका शिक्षक संघाने बहिष्कार घातला. यामुळे काही निवडक शिक्षकांच्या उपस्थितीत प्रशासनाला हा कार्यक्रम करावा लागला.

ठळक मुद्देसंविधान चौकात संघटनेची जंगी सभा : आंदोलनाच्या ठिकाणी आदर्श शिक्षकांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतील शिक्षकांच्या मागण्या मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. वारंवार आश्वासने देण्यात आली. परंतु त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही. याचा निषेध म्हणून महापालिका प्रशासनातर्फे शिक्षक दिनाला आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यावर नागपूर महानगरपालिका शिक्षक संघाने बहिष्कार घातला. यामुळे काही निवडक शिक्षकांच्या उपस्थितीत प्रशासनाला हा कार्यक्रम करावा लागला.सेवाज्येष्ठता यादी तातडीने प्रकाशित करणे, सहाव्या वेतन आयोगाची ५५ महिन्यांची थकबाकी, महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्यानुसार महागाई भत्त्याची ७२ महिन्यांची थकबाकी, राज्य शासनाप्रमाणे महापालिका शिक्षक व कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करावा, मनपा शाळांता १०० टक्के अनुदान द्यावे, मंजूर पदे भरण्यात यावी, सफाई कामगारांना नोकरीत स्थायी करावे, अशा विविध मागण्यासाठी महानगरपालिका कर्मचारी-शिक्षक संघटना समन्वय समिती लढा देत आहे. वारंवार आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्याने प्रशासनातर्फे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. याला शिक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल. १३०० पैकी फक्त ७ शिक्षण प्रशासनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. अशी माहिती मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांनी दिली. यावेळी राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लाईज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, देवराव मारोडकर, रंजन नलोडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाºया सात शिक्षकांचे संघटनेतील सदस्यत्व रद्द करण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.संविधान चौकात सभामहानगरपालिका कर्मचारी-शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे संविधान चौकात मंगळवारपासून साखळी उपोषण सुरू आहे. बुधवारी येथे आयोजित सभेला हजाराहून अधिक शिक्षक उपस्थित होते. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यावेळी आमदार नागो गाणार सुरेंद्र टिंगणे, राजेश गवरे, जम्मू आनंद आदींनी मार्गदर्शन केले. शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार जाहीर सभेत करण्यात आला.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTeacherशिक्षक