शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाची शाळा सोडून २५ वर्ष न्यायालयात हजेरी; अखेर निकाल त्यांच्याबाजूने लागला, पण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2022 17:21 IST

संस्थाचालकाकडून दुर्लक्ष, अधिकाऱ्यांचीही डोळेझाक

नागपूर : शिक्षण क्षेत्रात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचा फटका एका शिक्षकाला २५ वर्ष बसला. न्यायालयीन लढ्यात त्यांच्याबाजूने २०१५ मध्ये निकाल लागला. पण न्यायालयाच्या आदेशाला संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी केराची टोपली दाखविली. अखेर पीडित शिक्षक सेवानिवृत्त झाले. मात्र त्यांच्या पदरात न्याय काही पडला नाही.

पीडित शिक्षकाचे नाव अशोक पांडुरंग मेश्राम आहे. ते १ जुलै १९८९ मध्ये सहा. शिक्षक म्हणून ग्रामविकास विद्यालय सालवा, ता. मौदा येथे नियुक्त झाले होते. मात्र दोन वर्षानंतर त्यांना कोणतेही कारण न देता शाळेतून बडतर्फ करण्यात आले. त्याविरोधात मेश्राम यांनी शाळा न्यायाधिकरण, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय व परत उच्च न्यायालयात दाद मागितली. अखेर १८ नोव्हेंबर २०१५ रोजी न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला.

या निकालानुसार त्यांची मूळ पदावर नियुक्ती दिनांकापासून सलग सेवा धरण्यात यावी. त्यांना सेवेचे सर्व लाभ तसेच ६ ऑक्टोबर २००५ पर्यंतचे वेतन व त्यावर ६ टक्के व्याज देण्यात यावी, असे स्पष्ट केले. परंतु संस्थाचालक व मुख्याध्यापकाने उच्च न्यायालयाची अवहेलना केली. न्यायालयीन लाभ तर दिलेच नाही. परंतु त्यांची २०१५ पासून नवीन नियुक्ती दाखविण्यात आली आणि लगेच त्यांना अतिरिक्त दाखवून दुसऱ्या शाळेत पाठविण्यात आले. अखेर ३१ मे २०२२ रोजी ते सहा. शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले. परंतु त्यांना सेवानिवृत्तीच्या लाभापासूनही शाळेने वंचित ठेवले आहे.

- सहकुटुंब आत्मदहनाचा इशारा

मी शिक्षणाधिकारी,विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे वारंवार विनंती अर्ज केले. शिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना व्यथा सांगितले. परंतु त्यांनी मला न्याय देण्याऐवजी संस्थाचालकांचीच पाठराखण केली. शिक्षण उपसंचालकांनी ऐकुणच घेतले नाही. त्यामुळे अखेर कंटाळून मेश्राम यांनी १५ ऑगस्ट २०२२ रोजी कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण संचालक, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांनाही पत्राद्वारे कळविले असल्याचे मेश्राम यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालयTeacherशिक्षक