शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मागण्यांसाठी शिक्षक झोपले रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 21:32 IST

शासन निर्णयानुसार हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी टाकून अनुदानाची तरतूद करण्याच्या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेच्यावतीने मंगळवारी शिक्षकांनी विधिमंडळावर मोर्चा काढला.

ठळक मुद्देराज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेचा मोर्चा : मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी अडले शिष्टमंडळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासन निर्णयानुसार हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी टाकून अनुदानाची तरतूद करण्याच्या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती संघटनेच्यावतीने मंगळवारी शिक्षकांनी विधिमंडळावर मोर्चा काढला. मोर्चाचे शिष्टमंडळ वित्तमंत्री जयंत पाटील यांना भेटले, परंतु त्यांच्याकडून ठोस आश्वासन मिळाले नाही. यामुळे मोर्चाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अडून राहिल्याने मोर्चेकरीही रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर चक्क झोपले होते. 

आज नाही तर, उद्या वेतन मिळेल या अपेक्षेत विना अनुदानित उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील २५ हजार शिक्षकांची तब्बल १८ वर्षे निघून गेलीत. परंतु वेतनाची प्रतीक्षा आजही कायम आहे. तुटपुंज्या पगारावर भागत नसल्याने बहुसंख्य शिक्षकांवर भाजीपाल्यासह, दळणाची कामे करण्याची वेळ आली आहे. काही शिक्षक तर निवृत्तीच्याजवळ पोहचले आहेत. विशेष म्हणजे, या आंदोलनाला घेऊन दोन शिक्षकांनी आत्महत्या केल्या. मोर्चेकरांनी पोलिसांचा लाठीमारही सहन केला. यामुळे हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी टाकून अनुदानाची तरतूद करून वेतन देण्याचा निर्णय झाला. परंतु अनुदानाच्या पात्रतेसाठी १०० टक्के निकालाची अट घालण्यात आली, ती रद्द करण्यात यावी, तसेच पुरवणी मागणी मंजूर करून तात्काळ वेतन वितरणाचे आदेश द्यावे, या मागणीसाठी मोर्चेकरी रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर बसून होते.नेतृत्वमोर्चाचे नेतृत्व प्रा. दीपक कुलकर्णी, प्रा. संतोष वाघ, प्रा. अनिल परदेशी, प्रा. राहुल कांबळे, प्रा. दिगंबर पवार यांनी केले.मागण्या

  • २६ फेब्रुवारी २०१४च्या शासन निर्णयानुसार अनुदान द्यावे
  • क्षेत्रीय स्तरावरील पात्र अघोषित उच्च माध्यमिक शाळांना घोषित करून अनुदान द्यावे
  • २० टक्के सरसकट अनुदान शासन निर्णय रद्द करून सर्वांना प्रचलित नियमानुसार अनुदान देण्यात यावे
  • १०० टक्के निकालाची अट रद्द करावी.
टॅग्स :Morchaमोर्चाTeacherशिक्षकWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन