शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चहा १०, तर पाण्याची बाटली २० रुपयाला; नागपूर रेल्वेस्थानकावर लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 11:44 IST

रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेगाड्या आणि प्लॅटफार्मवरील अवैध व्हेंडरचा बंदोबस्त केला. परंतु सध्या रेल्वेस्थानकावरील स्टॉल्सवाल्यांकडूनच प्रवाशांची लूट होत आहे.

ठळक मुद्देअधिक दराने विक्रीसर्वच प्लॅटफार्मवरील स्टॉल्सवर गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वेगाड्या आणि प्लॅटफार्मवरील अवैध व्हेंडरचा बंदोबस्त केला. परंतु सध्या रेल्वेस्थानकावरील स्टॉल्सवाल्यांकडूनच प्रवाशांची लूट होत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून अधिक पैसे घेऊन त्यांना खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.नागपूर रेल्वेस्थानकावर पूर्वी अवैध व्हेंडरची संख्या फार मोठी होती. रेल्वे सुरक्षा दलाने सातत्याने कारवाई करून अवैध व्हेंडरचा बंदोबस्त केला. रेल्वेगाड्यातील व्हेंडरवरही अंकुश लावला. परंतु अलिकडील काळात रेल्वेस्थानकावर रेल्वे प्रशासनाने स्टॉल्स उपलब्ध करून दिलेल्या स्टॉल्सधारकांकडूनच प्रवाशांची लूट होत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर ८ प्लॅटफार्म आहेत. जवळपास सर्वच प्लॅटफार्मवर रेल्वेने दिलेल्या स्टॉल्सवर खाद्यपदार्थ, पाणी विकण्यात येते. परंतु स्टॉल्सवर काम करणारे कर्मचारी ७ रुपयांचा चहा १० रुपयाला, १५ रुपयांची पाण्याची बॉटल २० रुपयास विकत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एवढेच नाही तर इंडियन रेल्वे कॅटरींग अँड टुरिझमने प्रवाशांना स्वस्त दरात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी लावलेल्या वॉटर व्हेंडींग मशीनवरही प्रवाशांची लुट होत आहे. येथे नियमानुसार एक पाण्याची बॉटल ८ रुपयांना द्यावयास हवी. परंतु या स्टॉलवरही १० रुपये आकारून प्रवाशांची लूट करण्यात येत आहे.याबाबत एका प्रवाशाने मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे ‘डीआरएम’ सोमेश कुमार यांना टिष्ट्वट करून हा गैरप्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. परंतु अद्यापपर्यंत त्यावर काहीच कारवाई झाली नाही. रेल्वेस्थानकावर दररोज ४० ते ४५ हजार प्रवासी ये-जा करतात. प्लॅटफार्मवरील स्टॉल्सधारक प्रवाशांच्या गरजेचा फायदा घेऊन त्यांना अधिक दराने पदार्थांची विक्री करतात. त्यामुळे प्रवाशांची होत असलेली लूट थांबविण्याची मागणी होत आहे.प्रवाशांनी दरपत्रकानुसारच पैसे द्यावेत‘रेल्वेस्थानकावर प्रत्येक प्लॅटफार्मवर खाद्यपदार्थांचे दर असलेले दरपत्रक रेल्वे प्रशासनाने लावले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी या दरपत्रकानुसारच पैसे द्यावेत. एखाद्या स्टॉलवर अधिक पैसे घेण्यात येत असतील तर त्वरित त्याची तक्रार रेल्वे प्रशासनाकडे करावी. संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करण्यात येईल.’- एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे नागपूर विभाग

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर