शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

टीबीझेड संचालकानी केली उच्च न्यायालयाशी धोकेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 23:00 IST

दीड किलो सोन्यावर दर महिन्याला दोन टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून वकिलाची फसवणूक करणाऱ्या बहुचर्चित टीबीझेड ज्वेलर्सचे संचालक हेमंत झवेरी यांनी जमानतीसाठी उच्च न्यायालयात बोगस दस्तावेज सादर केले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देजमानतीसाठी सादर केले बोगस दस्तावेज : सदर पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : दीड किलो सोन्यावर दर महिन्याला दोन टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून वकिलाची फसवणूक करणाऱ्या बहुचर्चित टीबीझेड ज्वेलर्सचे संचालक हेमंत झवेरी यांनी जमानतीसाठी उच्च न्यायालयात बोगस दस्तावेज सादर केले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पूर्वीच फसवणूक व एमपीआयडी अन्वये कारवाई झालेल्या झवेरींच्या अडचणी आणखी वाढल्या आहे.काटोल रोड येथील रहिवासी वकील मनीष देशराज यांनी २०१५ मध्ये छावणीच्या पुनम चेंबर येथील त्रिभुवनदास भिमजी झवेरी यांच्याकडे ३८ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोने जमा केले होते. सुरुवातीला काही महिने टीबीझेडचे संचालक हेमंत झवेरी यांनी देशराज यांना व्याज दिले. व्याज देणे बंद केल्यानंतर देशराज यांनी त्यांच्याकडे तगादा लावला. अखेर देशराज यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. २०१८ मध्ये सदर पोलिसांनी झवेरी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. यानंतर झवेरी यांनी देशराज यांना प्रत्येक महिन्याला ३.५० लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण झवेरी यांंनी ते दिले नाही. तीन महिन्यापूर्वी झवेरी व त्याचा भाचा सागर झवेरी याच्याविरुद्ध सदर पोलिसांनी फसवणुकीचा तसेच एमपीआयडी अन्वये गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणात झवेरी यांनी जमानतीसाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या वकिलांनी मनीष देशराज यांना पैशाच्या मोबदल्यात सोने परत करण्यात आल्यासंदर्भात १० चेक व ६ पावत्या सादर केल्या. पावतीत झवेरी यांनी ३.५० लाख रुपयांच्या बदल्यात देशराज यांना सोने परत केल्याचा उल्लेख होता. पावतीवर देशराज यांच्या सह्या सुद्धा होत्या. पण सह्या बनावट असल्याचे देशराज यांचे म्हणणे होते. देशराज यांची माहिती गंभीरतेने घेऊन उच्च न्यायालयाने सदर पोलिसांना प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. सदर पोलिसांनी तपासाचा अहवाल न्यायालयात सादर केला. यात झवेरी यांच्या वकिलाकडून न्यायालयात सादर केलेले दस्तावेज बोगस असल्याचा खुलासा केला. या आधारे सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. झवेरी चार वर्षापूर्वी शोरूम बंद करून मुंबईला पळाला आहे. त्याने गुंतवणुकीच्या नावावर अनेक लोकांसोबत धोकेबाजी केली आहे. हे प्रकरण झवेरीसाठी अडचणी निर्माण करणार आहे. यात त्याला अटकही होऊ शकते.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयfraudधोकेबाजी