शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी महसूलवाढीचा फायदा करदात्यांना मिळावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:49 IST

केंद्र सरकारने १ जुलै २०१७ ला वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केला होता. एक वर्षात जीएसटी महसुलात वाढ झाली असून त्याचा फायदा करदात्यांना मिळावा, अशी मागणी विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनने (व्हीटीए) जीएसटीवर आयोजित चर्चासत्रात केली आहे.

ठळक मुद्देव्हीटीएची मागणी : २८ टक्के जीएसटी १८ वर आणावा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र सरकारने १ जुलै २०१७ ला वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केला होता. एक वर्षात जीएसटी महसुलात वाढ झाली असून त्याचा फायदा करदात्यांना मिळावा, अशी मागणी विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनने (व्हीटीए) जीएसटीवर आयोजित चर्चासत्रात केली आहे.व्हीटीएचे अध्यक्ष जे.पी. शर्मा यांनी सांगितले की, अर्थिक वर्षात शासनाला अपेक्षेपेक्षा जास्त जीएसटी मिळाला आहे. १५ टक्क्यांपर्यंत जीएसटी अदा करण्याचा नागरिकांचा मानस आहे. २८ टक्क्यांचा करटप्पा समाप्त करून त्याचा १८ टक्क्यांत समावेश करावा. २८ टक्के कर टप्प्यातील वस्तूंची खरेदी बिलाविना होत असल्यामुळे व्यापाऱ्यांना वस्तूंच्या विक्रीत अडचणी येत आहेत.उपाध्यक्ष रामकिशन ओझा म्हणाले, विभिन्न नियम, विभिन्न करटप्पा आणि आधुनिक रिटर्न प्रणालीमुळे व्यापारी त्रस्त आहेत. शासनाची एक देश एक कर, ही घोषणा वर्तमान स्थितीत अनेक मैल दूर आहे.व्हीटीएचे सचिव तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, जीएसटी लागू झाल्यानंतर देशात कर बेसमध्ये जवळपास ७० टक्के वाढ होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. त्यानुसार बेस वाढल्यामुळे शासनाच्या महसुलात वाढ झाली आहे. अशा स्थितीत शासनाने करात कपात करून वाढलेल्या महसुलाचा फायदा नागरिकांना द्यावा. जीएसटीमध्ये सुधारणा करून त्यात पारदर्शकता आणावी. त्यामुळे व्यापाऱ्यांना रिटर्न फाईल भरण्यास सुविधा होईल आणि २८ टक्के करटप्पा समाप्त करून त्यात सहभागी वस्तूंना १८ टक्के करटप्प्यात आणावे. तसेच दैनंदिन वस्तूंवरील जीएसटी रद्द करून नागरिकांवरील अतिरिक्त कराचा बोझा कमी करावा, अशी मागणी रेणू यांनी केली आहे.

टॅग्स :GSTजीएसटीTaxकर