शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

कर वसुली करा अन्यथा कारवाई : सभापतींचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:41 IST

शहरातील मालमत्ता कर वसुलीबाबत सर्व झोनला दिलेले कर वसुलीचे ९० टक्के उद्दिष्ट ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करा, अन्यथा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी गुरुवारी समितीच्या आढावा बैठकीत दिला.

ठळक मुद्देझोन थकबाकी मुक्त करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मालमत्ता कर वसुलीबाबत सर्व झोनला दिलेले कर वसुलीचे ९० टक्के उद्दिष्ट ३१ मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करा, अन्यथा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा कर आकारणी व कर संकलन विशेष समितीचे सभापती संदीप जाधव यांनी गुरुवारी समितीच्या आढावा बैठकीत दिला.यावेळी समितीचे उपसभापती सुनील अग्रवाल, सदस्या अ‍ॅड. मीनाक्षी तेलगोटे, मंगला लांजेवार, कर व कर आकारणी विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त सुभाष जयदेव, प्रकाश वराडे, अशोक पाटील, गणेश राठोड, हरीश राऊ त, स्मिता काळे, सुवर्णा दखणे यांच्यासह सर्व झोनचे कर अधीक्षक, सहायक कर निर्धारक उपस्थित होते.मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असल्याने कर वसुलीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना वारंवार निर्देश देण्यात आले. त्यानंतरही निर्धारित वेळेत उद्दिष्टानुसार कर वसुली करण्यात आलेली नाही. प्रत्येक झोनला थकबाकी मुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार झोनमधील काही वॉर्ड थकबाकीमुक्त होत आहे. ही संख्या वाढविण्याची गरज आहे.३१ मार्चपर्यंत सर्व झोनकडून ९० टक्के कर वसुली अपेक्षित आहे. त्यापेक्षा कमी कर वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच यासाठी संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यालाही जबाबदार धरून कारवाई करण्याचा इशारा जाधव यांनी यावेळी दिला.सायबरटेक कंपनी व मे. अनंत टेक्नॉलॉजी लि. यांच्या कामाचाही आढावा घेतला. कर वसुली संदर्भात सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मानसिकता बदलून जबाबदारीने काम करावे, प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडवा, त्यांच्याशी संवाद साधा, कर भरण्यासाठी प्रवृत्त करा असे आवाहन जाधव यांनी केले.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर