शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रांना मिळणार आता टाटा ट्रस्टचे ‘बूस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 20:52 IST

महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव असल्याने गरजूंना उत्तम दर्जाचे उपचार मिळत नाही. परंतु आता मुंबई येथील टाटा ट्रस्ट महापालिकेच्या आरोग्य केंद्रांचे बळकटी करून चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करणार आहे.

ठळक मुद्देउत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करणारपहिल्या टप्प्यात आठ आरोग्य केंद्रांचा विकास

आॅनलाईन लोकमतनागपूर : महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव असल्याने गरजूंना उत्तम दर्जाचे उपचार मिळत नाही. परंतु आता लवकरच गरजूंना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. मुंबई येथील टाटा ट्रस्ट महापालिकेच्या आरोग्य केंद्रांचे बळकटी करून चांगल्या दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करणार आहे. सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी दिली.‘मोडल आॅफ युनिव्हर्सल प्रायमरी हेल्थ केअर इन नागपूर सिटी’ प्रकल्प महापालिका व टाटा ट्रस्ट संयुक्तपणे राबविणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत टाटा ट्रस्ट हा प्रकल्प राबविणार आहे.टाटा ट्रस्टचा यामागे कोणताही व्यावसायिक उद्देश नाही. या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च ट्रस्ट करणार आहे. यातून महापालिकेच्या २६ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटीकरण के ले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ आरोग्य केंद्रांचा समावेश आहे. याचा महापालिकेवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नसल्याची माहिती संदीप जाधव यांनी दिली.

प्रकल्पाच्या काही ठळक बाबी- सदर प्रकल्प तीन वर्षांकरिता राबविण्यात येईल.-महापालिका टाटा ट्रस्ट यांना कार्यालयीन कामाकरिता जागा, विद्युत व पाण्याची मोफत सुविधा उपलब्ध क रून देईल.- टाटा ट्रस्ट हे सदर रोगनिदान कें द्र येथे केंद्रीय प्रयोगशाळा स्थापन करतील. प्रयोगशाळेकरितालागणारे मनुष्यबळ व इतर आवश्यक बाबींकरिता लागणारा खर्च ट्रस्ट करतील.-महापालिका नागरी आरोग्य केंद्राकरिता लागणारे मनुष्यबळ, औषधी उपलब्ध करून देईलव दवाखान्याचे आवश्यक नूतनीकरण करेल.- टाटा ट्रस्ट प्रयोगशाळेत आकारण्यात येणारे शुल्क महापालिकेच्या दरानुसार आकारेल. तसेचहे दर उपलब्ध नसल्यास राज्य शासनाच्या व केंद्र शासनाने ठरविलेल्या दरानुसार आकारण्यात येईल.-प्रयोगशाळेत जमा होणारा निधी महापालिका व टाटा ट्रस्ट यांच्यामध्ये प्रत्येकी ५० टक्के विभागूनघेण्यात येईल.-विभागून देण्यात आलेला निधीचा उपयोग टाटा ट्रस्ट प्रयोगशाळेकरितालागणाऱ्या घटकांवर खर्च करतील.

टॅग्स :Healthआरोग्य