शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ज्येष्ठ नागरिकांना केले जातेय टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 10:14 IST

ते येतात, धाकदपट करतात. ‘पोलीस आहोत आम्ही’, असे सांगणाऱ्या या गुन्हेगारांनी उपराजधानीत प्रचंड दहशत निर्माण केली आहे.

ठळक मुद्देतोतया पोलिसांचा हैदोस सुरूचकुठे गेले स्मार्ट पोलिसिंग ?

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ते येतात, धाकदपट करतात. रहदारीच्या मार्गावर अनेकांसमोर ज्येष्ठांचे दागिने त्यांच्याच हाताने त्यांच्या अंगावरून काढून घेतात अन् पळून जातात. त्यांना ना कुणाचा धाक, न दरारा. ‘पोलीस आहोत आम्ही’, असे सांगणाऱ्या या गुन्हेगारांनी उपराजधानीत प्रचंड दहशत निर्माण केली आहे. आयुष्यभर काटकसर करून दागिन्यांच्या रुपात आपली कमाई जपणारे पीडित अशा प्रकारे लुटले गेल्यामुळे कमालीचे व्यथित झाले आहेत. वृद्धत्वामुळे आधीच हतबल झालेल्या या ज्येष्ठांना पोलिसांच्या नावाने लुटमार करणाऱ्या समाजकंटकांनी अक्षरश: हादरवून सोडले आहे.पोलीस असल्याचे सांगून अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना दोन आठवड्यांपूर्वी सीताबर्डी पोलिसांनी पकडले त्यामुळे आता पुन्हा ज्येष्ठ नागरिकांचे दागिने लुटण्याचे गुन्हे होणार नाही, असा गोड समज सर्वसामान्य नागरिकांसोबत काही पोलिसांनीही करून घेतला होता. मात्र, सोमवारी ४ जूनला एकाच दिवशी उपराजधानीत हुडकेश्वर, प्रतापनगर आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्येष्ठ नागरिकांचे दागिने लुटून नेण्याचे तीन गुन्हे घडले. त्यामुळे साऱ्यांनाच पुन्हा एकदा धसका बसला आहे.पोलिसांसारखे धडधाकट दिसणारे अन् पोलिसांसारखेच वर्तन करणारे हे गुन्हेगार ५० वर्षांपुढील महिला-पुरुषांना हेरतात. ज्येष्ठ नागरिक या गुन्हेगारांचे सॉफ्ट टार्गेट आहे. जास्त वर्दळ नसलेल्या ठिकाणी त्यांना अडवतात.त्यांच्या नजरेत आलेल्या व्यक्तीला ते स्वत:चा परिचय कधी सीबीआय, कधी सीआयडीचे अधिकारी तर कधी पोलीस आहोत म्हणून देतात. ‘समोर काही अंतरावर लुटमार झाली किंवा अन्य कोणता मोठा गुन्हा घडला, अशी थाप मारतात. तुम्हाला लुटमारीची भीती वाटत नाही का, असा प्रश्न करून तुम्ही तुमचे दागिने अंगावरून काढून पिशवीत ठेवा, असा सल्ला देतात. प्रसंगी जवळचा रुमाल किंवा कागद देतात. त्या रुमालात किंवा कागदात दागिने ठेवण्याचा बनाव करून रुमालाची ती पुठळी किंवा पुडी संबंधित व्यक्तीच्या हातात देऊन पळून जातात.कधी लुटमार झाल्याची किंवा अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे सांगूनही धाक दाखवता आणि त्यांची तपासणी करण्याच्या नावाखाली दागिने घेऊन पळून जातात. घटनेच्या काही वेळेनंतर संबंधित व्यक्तीला आपले दागिने लुटल्याचे आणि ते पोलीस नव्हे तर भामटे होते, हे लक्षात येते. विशेष म्हणजे, अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आंतरराज्यीय इराणी टोळीचा छडा तीन आठवड्यांपूर्वी सीताबर्डी पोलिसांनी लावला. १६ मे रोजी या टोळीतील हुमायूं जाफरी (वय ४३, रा. आम्बिवली मुंबई) आणि इमरान अली नाजिर अली (वय २५, रा. टिकरीटोला, शहाडोल, मध्य प्रदेश) या दोघांना सीताबर्डी पोलिसांनी अटक केली.त्यांच्याकडून पोलिसांनी १२ लाखांचे सोनेही जप्त केले. त्यांच्याकडून नऊ गुन्हे उघडकीस आल्यामुळे आता असे गुन्हे नागपुरात घडणार नाहीत, असा सर्वसामान्य नागरिक तसेच शहर पोलिसांनी भाबडा समज करून घेतला होता. मात्र, गुन्हेगारांनी तो खोटा ठरवला. सोमवारी हुडकेश्वर, प्रतापनगर आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तोतया पोलिसांनी तीन ज्येष्ठ नागरिकांचे लाखोंचे दागिने लुटून नेले.

टॅग्स :Policeपोलिस