शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

नागपुरातील मृत्यूदर शून्यावर आणण्याचे असेल ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 21:54 IST

नागपुरात कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढण्याबरोबरच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मृत्यूचा आकडा शून्यावर आणणे कठीण आहे, परंतु नागपूर महापालिका यासाठी पूर्ण प्रयत्न क रेल. संक्रमितांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळावा, यासाठी खासगी व सरकारी रुग्णालयासोबत उत्तम समन्वय बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. एकूणच मनपाची पहिली प्राथमिकता कोरोनावर नियंत्रण मिळविणे आहे, असे मनपाचे नवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देनवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांभाळला पदभारअधिकाऱ्यांची बैठक घेऊन केली कोरोनाच्या स्थितीची समीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढण्याबरोबरच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मृत्यूचा आकडा शून्यावर आणणे कठीण आहे, परंतु नागपूर महापालिका यासाठी पूर्ण प्रयत्न क रेल. संक्रमितांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळावा, यासाठी खासगी व सरकारी रुग्णालयासोबत उत्तम समन्वय बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. एकूणच मनपाची पहिली प्राथमिकता कोरोनावर नियंत्रण मिळविणे आहे, असे मनपाचे नवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले यांनी स्पष्ट केले.शुक्रवारी राधाकृष्णन बी. यांनी मनपा आयुक्तांचा पदभार सांभाळला. तुकाराम मुंढे पॉझिटिव्ह आल्याने ते उपस्थित नव्हते. पदभार स्वीकारताना अप्पर आयुक्त जलज शर्मा, राम जोशी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. चार्ज घेतल्यानंतर ते तात्काळ अ‍ॅक्शन मोडवर आले. अधिकारी व विभाग प्रमुखांसोबत बैठक घेऊन कोरोनाची वर्तमान स्थिती व उपाययोजना संदर्भातील माहिती घेतली. मुंबईतील बीएमसीच्या काही रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचा अनुभव असल्याचे सांगत ते म्हणाले की, रुग्ण संक्रमित आढळल्यानंतर त्याला तात्काळ उपचार मिळणे गरजेचे आहे. गोल्डन अवरमध्ये उपचार मिळत नसल्याने मृत्यूची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. ज्यांना कोरोनाची लक्षण दिसत असेल त्यांनी तात्काळ टेस्ट करावी. पॉझिटिव्ह आल्यानंतर मधुमेह, बीपी, हायपरटेन्शन व अन्य आजाराने ग्रस्त व्यक्तींना होम आयसोलेशन न करता रुग्णालयात भरती होणे गरजेचे आहे. शिवाय आॅक्सिजनची लेव्हल उत्तम ठेवावी लागेल.टेस्टींगकडे दुर्लक्ष नकोआयुक्त राधाकृष्णन यांना जेव्हा पत्रकारांनी कोरोना टेस्टींग सेंटरवर होत असलेल्या मनमानीबाबत अवगत केल्यावर ते म्हणाले की आता दुर्लक्ष खपवून घेणार नाही. जो वेळ दिला आहे, त्या दरम्यान टेस्ट करावी लागणार आहे. ज्या सेंटरची जेवढी क्षमता आहे, त्याची माहिती घ्यावी लागेल. होम क्वारंटाईन असलेल्या ज्येष्ठ नागरिकांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. जर कुठल्या व्यक्तीमध्ये लक्षण दिसून आल्यास त्यांची अ‍ॅन्टीजन टेस्ट निगेटीव्ह आली असेल तर आरटीपीसीआर टेस्ट करणे आवश्यक असेल अशी व्यवस्था करणार. यावेळी नवीन आयुक्तांना आरोग्य अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे, टेस्टींग सेंटरवर ११ ते १२ वाजेपर्यंत कर्मचारीच येत नसल्याचे, रिपोर्ट चार चार दिवस मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.जनतेसोबत लोकप्रतिनिधींचेही ऐकून घेतले जाईलआयुक्त राधाकृष्णन बी. यांनी स्पष्ट केले की, नागपूर मनपा लोकाभिमुख बनवायची आहे. त्यासाठी जनतेसोबतच लोकप्रतिनिधींचेही ऐकून घेतले जाईल. त्यांना विश्वासात घेऊन कामे केली जातील. लोकतांत्रिक व्यवस्थेचा आदर होईल. कायद्यानुसार जे योग्य असेल ती कामे केली जातील. प्रशासन व पदाधिकाºयांमध्ये उत्तम समन्वय ठेवून काम करण्यात येईल. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे दोन गाडीचे मुख्य चाक आहेत. लोकप्रतिनिधींना जनतेने निवडून पाठविले आहे. त्यामुळे ते जनतेचीच कामे घेऊन येतील. त्यामुळे त्यांचेही ऐकणे गरजेचे आहे. प्रशासन व सत्तापक्षात संतुलन ठेवून कामे केली जातील.खर्चाची प्राथमिकता ठरविण्यात येईलनवनियुक्त आयुक्तांनी सांगितले की, कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्राची आर्थिक स्थिती वाईट आहे. नागपूर महापालिकेलाही फटका बसला आहे. मनपाच्या वित्तीय स्थितीची समीक्षा करण्यात येईल. त्यानुसार खर्चाची प्राथमिकता ठरविण्यात येईल. विकास कामांना सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल.बस संचालन व ऑड-इव्हन व्यवस्थेची करणार समीक्षानवीन आयुक्त म्हणाले की सिटी बस संचालनाची आवश्यकता व वर्तमान सार्वजनिक परिवहन व्यवस्था याची समीक्षा करण्यात येईल. व्यापाऱ्यांसाठी ऑड-इव्हन व्यवस्था रद्द करण्याच्या मागणीची समीक्षा केली जाईल. सध्या संक्रमणावर अंकुश लावण्यासाठी बस बंद आहे व ऑड-इव्हन व्यवस्था सुरू आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcommissionerआयुक्त