शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

काटोल-नागपूर रोडवरील ताराबोडीत भरदिवसा १६ लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 21:51 IST

बँकेतून उचल केलेली रक्कम एटीएममध्ये टाकण्यासाठी जात असलेल्या खासगी एजन्सीच्या दोन कर्मचाऱ्यांना तिघांनी भरदिवसा लुटल्याची घटना काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटोल-नागपूर रोडवरील ताराबोडी शिवारात सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. यात लुटारूंनी त्यांच्याकडील १६ लाख रुपये ठेवलेली बॅग हिसकावून घेतली. वृत्त लिहिस्तो लुटारूंचा सुगावा लागला नव्हता.

ठळक मुद्देएटीएममध्ये रक्कम टाकण्यासाठी दुचाकीचा वापर !

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (काटोल ) : बँकेतून उचल केलेली रक्कम एटीएममध्ये टाकण्यासाठी जात असलेल्या खासगी एजन्सीच्या दोन कर्मचाऱ्यांना तिघांनी भरदिवसा लुटल्याची घटना काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटोल-नागपूर रोडवरील ताराबोडी शिवारात सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. यात लुटारूंनी त्यांच्याकडील १६ लाख रुपये ठेवलेली बॅग हिसकावून घेतली. वृत्त लिहिस्तो लुटारूंचा सुगावा लागला नव्हता.धनराज गुलाबराव चरपे (४०) व अनुप रामकृष्ण वनकर (३२) दोघेही रा. येनवा, ता. काटोल हे ‘लॉजीकॅश’ नामक एजन्सीचे कर्मचारी असून, ते काटोल शहर व परिसरातील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये रक्कम टाकण्याचे काम करतात. या दोघांनी सोमवारी सकाळी भारतीय स्टेट बँकेच्या काटोल शाखेतून नेहमीप्रमाणे ५१ लाख रुपयांची उचल केली आणि ती रक्कम बॅगमध्ये घेऊन त्यांच्या एमएच-४०/एबी-३८८६ क्रमांकाच्या मोटरसायकलने निघाले. सुरुवातीला त्यांनी काटोल शहरातील गळपुरा येथे असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये २२ लाख रुपये टाकले आणि मेटपांजऱ्याच्या दिशेने निघाले.त्यांनी मेटपांजरा येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये १३ लाख रुपयांचा भरणा केला आणि उर्वरित १६ लाख रुपये घेऊन कोहळी (ता. कळमेश्वर) शिवारातील भागीरथ टेक्सटाईलजवळील एटीएममध्ये भरण्यासाठी निघाले. दोघेही ताराबोडी शिवारात पोहोचताच मागून (काटोलहून) मोटरसायकलने आलेल्या तिघांनी त्यांच्या मोटरसायकलला धक्का दिला. चालकाचा ताबा सुटल्याने दोघेही खाली कोसळले. त्यातच मोटरसायकलवरील एकाने त्यांच्याजवळील रकमेची बॅग हिसकावून घेतली तर दुसºयाने लगेच त्याची मोटरसायकल वळविली. त्यानंतर तिघेही मोटरसायकलने काटोलच्या दिशेने पळून गेले.दरम्यान, दोघांनीही काटोल पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. दुसरीकडे, पोलिसांनी नाकाबंदी करून तपासाला सुरुवात केली. यात पोलिसांनी या मार्गावरील काटोल शहरालगतच्या टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र, लुटारू कुठेही आढळून आले नाहीत. त्यामुळे ते या दोघांच्या मागावर असून, मेंढेपठार मार्गाने पळून गेले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. शिवाय, फिर्यादीकडून संपूर्ण हकीकत जाणून घेतली. याप्रकरणी काटोल पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि ३९४ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Robberyदरोडाatmएटीएम