शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तापी-गोदावरी नदी जोडचे काम तीन महिन्यात सुरूहोणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 01:02 IST

नद्यांतून समुद्रात जाणारे पाणी रोखण्यासाठी येत्या काळात काम केले जाणार आहे. दमण गंगा प्रकल्प व तापी- गोदावरी नदी जोड प्रकल्प पूर्ण केले जातील.

ठळक मुद्देनितीन गडकरी : मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राचा पाणी प्रश्न मिटणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नद्यांतून समुद्रात जाणारे पाणी रोखण्यासाठी येत्या काळात काम केले जाणार आहे. दमण गंगा प्रकल्प व तापी- गोदावरी नदी जोड प्रकल्प पूर्ण केले जातील. येत्या तीन महिन्यात तापी- गोदावरी नदी जोड प्रकल्पाचे काम सुरू होईल. यामुळे मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राचा पाणीप्रश्न मिटेल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.गडकरी म्हणाले, राज्यात सध्या असलेले २२ टक्के सिंचन वाढवून ४० टक्क्यांवर नेण्याची योजना आहे. त्यासाठी समुद्रात वाहून जाणारे पाणी नद्यांमध्ये अडविणे आवश्यक आहे. दमण गंगा प्रकल्प व तापी- गोदावरी नदी जोड प्रकल्प, या दोन्ही प्रकल्पांसाठी ४० हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. यापैकी १० टक्के वाटा महाराष्ट्र व १० टक्के वाटा गुजरात सरकार उचलेल. उर्वरित रक्कम केंद्र सरकार देईल. या नदी जोड प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील सर्व धरणे तुडुंब भरतील. यामुळे येथील पाण्याचा प्रश्न सुटेल. गोसेखुर्द प्रकल्पातून पाणी वळविण्याबाबत लवकरच बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.९० टक्के काम झालेले प्रकल्प पूर्ण करणारविदर्भासह राज्यातील असे काही प्रकल्प आहेत की ज्यांचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यांना थोडा निधी दिला की उर्वरित काम पूर्ण होऊन त्यातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते. यासाठी पंतप्रधान सिंचन योजनेंतर्गत निधी दिला जाईल, असेही गडकरी यांनी सांगितले.विदर्भात बांबू मिशनयेत्या काळात विदर्भात मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीवर भर दिला जाईल. शेतकºयांच्या धुºयावर बाबूंची लागवड केली जाईल. बांबू लागवडीसाठी नर्सरी सुरू केल्या जातील. वेस्टर्न कोल फिल्ड, मॅगनीज ओअरच्या रिकाम्या जागेवर बांबू लागवड केली जाईल. यामुळे शेतकºयांना आर्थिक उत्पन्न मिळेल व विदर्भाचे चित्र पालटेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.गडकरी म्हणाले...विदर्भातही उसाची लागवड वाढत आहे. त्यामुळे गोसेखुर्दच्या क्षेत्रात वसंतदादा साखर इन्स्टिट्यूटला उसावर संशोधन व मार्गदर्शनासाठी ४५ एकर जागा दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.वर्धा जिल्ह्यात गुजरातच्या कंपनीतर्फे ५० हजार एकर जागेवर आॅरगॅनिक कापूस लावण्यात येणार आहे. संबंधित कंपनीने शेतकºयांकडून सव्वापट दराने कापूस खरेदी करावा, असा प्रस्ताव देण्यात आला आहे.आयटीसी कंपनीतर्फे गडचिरोलीमध्ये बांबूपासून अगरबत्तीच्या काड्या तयार करण्याचा कारखाना उभारला जात आहे.