शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची प्रतिमा स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:01 IST

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यावर ‘सेक्स फॉर डिग्री’ प्रकरणात होत असलेल्या आधारहीन व निंदनीय आरोपांचा महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाने निषेध केला आहे. पुरोहित यांच्या स्वच्छ प्रतिमेला कलंकित करण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला जात असल्याचे महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रम्हाशंकर त्रिपाठी, सरचिटणीस शिरिष बोरकर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

ठळक मुद्देश्रमिक पत्रकार संघ : लैंगिक प्रकरणातील आरोपांचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यावर ‘सेक्स फॉर डिग्री’ प्रकरणात होत असलेल्या आधारहीन व निंदनीय आरोपांचा महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाने निषेध केला आहे. पुरोहित यांच्या स्वच्छ प्रतिमेला कलंकित करण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला जात असल्याचे महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रम्हाशंकर त्रिपाठी, सरचिटणीस शिरिष बोरकर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.नागपुरातील माध्यमे गेल्या अनेक वर्षांपासून पुरोहित यांना सामाजिक तत्त्व सांभाळून जगणारे व सतत जनतेच्या भल्याचा विचार करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखतात. सर्वांना अत्यंत आदर असल्यामुळे ते बाबूजी म्हणून सर्वत्र लोकप्रिय आहेत. मध्य भारतातील माध्यम प्रतिनिधींसाठी ते पितृतुल्य आहेत. ते नेहमीच भ्रष्टाचार व अन्यायाविरुद्ध लढत असतात. माध्यम प्रतिनिधींच्या संघर्षात सहभागी होत असतात. ते सन्माननीय लोकप्रतिनिधी आहेत. ‘हितवाद’ या इंग्रजी दैनिकाचे व्यवस्थापकीय संपादक हे पद व शैक्षणिक संस्थांच्या प्रशासकाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. वैयक्तिक स्वार्थाचा विचार न करता त्यांनी समाजाकरिता अनेक महत्त्वाची कार्ये केली आहेत. अशा आदरणीय व्यक्तिमत्त्वावर होत असलेल्या अवमानकारक आरोपांना कुणीच महत्त्व द्यायला नको. सर्व आरोप निरर्थक आहेत. आरोपांना प्रसिद्धी देणारे केवळ कुप्रवृत्तीचे दर्शन घडवित आहेत. पुरोहित यांच्या नेतृत्वातील सर्व संस्थांमध्ये मोठ्या संख्येत महिला कार्यरत आहेत. त्यांना कधीच कोणताही त्रास झाला नाही. कामाच्या ठिकाणी त्या स्वत:ला सुरक्षित समजतात. अशा परिस्थितीत पुरोहित यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे खेदजनक आहे अशी भूमिका संघाने मांडली आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगJournalistपत्रकार