शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

प्रतिभावान खेळाडूंनी वाढविला नागपूरचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 11:21 IST

शहरातील दोन युवा प्रतिभावान खेळाडू आपापल्या खेळात यशोशिखर गाठण्याचे ध्येय बाळगून आहेत. १२ वर्षांचा रौनक साधवानी बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय मास्टर बनला तर १७ वर्षीय मालविकाने आशियाई शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविले.

ठळक मुद्देमालविका, रौनकचे यशोशिखर गाठण्याचे ध्येय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील दोन युवा प्रतिभावान खेळाडू आपापल्या खेळात यशोशिखर गाठण्याचे ध्येय बाळगून आहेत. १२ वर्षांचा रौनक साधवानी बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय मास्टर बनला तर १७ वर्षीय मालविकाने आशियाई शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविले. दोघांच्याची कामगिरीने आॅरेंज सिटीच्या क्रीडावैभवात भर पडली आहे. दोघांच्याही भरारीची दखल घेत स्पोर्टस् जर्नलिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरने (एसजेएएन) शुक्रवारी एका कार्यक्रमात त्यांच्या भावी योजना जाणून घेतल्या.पत्रकारांशी संवाद साधताना शिवाजी विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेली मालविका म्हणाली,‘माझे अंतिम ध्येय बॅडमिंटनच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळविणे हेच आहे. यंदाअखेर देशात नंबर वन बनण्याचे उद्दिष्ट आखले असून राष्ट्रीय तसेच राज्य स्पर्धा जिंकायची आहे.’आशियाई शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन योगायोगाने नागपुरातच होत असल्याने घरच्या प्रेक्षकांपुढे खेळण्यास मालविका उत्सुक आहे. डावखुरी असलेली मालविका म्हणाली,‘ आशियाई शालेय बॅडमिंटन स्पर्धा मोठी आहे. जेतेपदासाठी मला चायनीज तायपेई, इंडोनेशिया आणि मलेशियाच्या खेळाडूंचे आव्हान मोडून काढावे लागेल. महाराष्ट्रातील सर्वांत कमी वयाचा आंतरराष्ट्रीय मास्टर होण्याचा मान संपादन करणारा रौनक म्हणाला,‘ इतक्या कमी वयात अशी कामगिरी होईल,असा विचारही मनात डोकावला नव्हता. पण आता ग्रॅन्डमास्टर होण्यासाठी मेहनत घेणार. २०१६ मध्ये मी स्पेनमधील स्पर्धेत खेळताना आयएम होण्याचा विचार डोक्यात आला.

ररोज आठ- दहा तास सराव करीत मी आक्रमक चाली खेळतो.’रौनक हा बुद्धिबळाशिवाय जलतरणात पटाईत आहे. बुद्धिबळामुळे अभ्यासावर परिणाम होतो का, असे विचारताच वयाच्या आठव्या वर्षांपासून बुद्धिबळात आलेला रौनक म्हणाला,‘ अभ्यास मागे पडतो पण त्यासाठी आवडता खेळ सोडणार नाही. माझे वडील आणि विश्व चॅम्पियन विश्वनाथन आनंद हे माझे मार्गदर्शक आहेत. खेळातील बारकावे आणि डावपेच शिकविणारे ग्रॅन्डमास्टर स्वप्निल धापोडे याचेही रौनकने आभार मानले. प्रारंभी एसजेएएन सचिव संदीप दाभेकर आणि कोषाध्यक्ष सुहास नायसे यांनी दोन्ही खेळाडूंचे स्वागत केले. डॉ. राम ठाकूर यांनी संचालन केले. कार्यक्रमाला मालविकाचे कोच किरण माकोडे हे देखील उपस्थित होते.

टॅग्स :Sportsक्रीडा