शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी भरती परीक्षा घोटाळा; खंडपीठाची सरकारला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 06:40 IST

चार आठवड्यांत उत्तर दाखल करा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्यातील बहुचर्चित तलाठी पदभरती घोटाळा प्रकरणामध्ये महसूल विभागाचे सचिव व राज्य परीक्षा समन्वयक यांना नोटीस बजावून चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील उमेदवार नीलेश गायकवाड याने या घोटाळ्यासंदर्भात याचिका दाखल करून घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी, माजी न्यायाधीश, सायबर तज्ज्ञ आदींचे विशेष पथक स्थापन करण्यात यावे, पद भरतीमध्ये होणारे गैरव्यवहार टाळण्यासाठी कायमस्वरूपी प्राधिकरण स्थापन करण्यात यावे, तलाठी पदभरती घोटाळ्यातील आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, आदी मागण्या केल्या आहेत. तलाठ्याची ४ हजार ६४४ पदे भरण्याकरिता १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत परीक्षा घेण्यात आली. एकूण ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. त्यात अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याचे उघड झाले होते.

उमेदवारांकडून घेतले प्रत्येकी १० लाख रुपयेअनेक ठिकाणी परीक्षेचे पेपर फुटले. तांत्रिक उपकरणांचा उपयोग करून विशिष्ट उमेदवारांना प्रश्नांची उत्तरे पुरविण्यात आली. आरोपी राजू नागरे व त्याच्या साथीदारांनी अशा उमेदवारांकडून प्रत्येकी १० लाख रुपये घेतले. ५ सप्टेंबर २०२३ रोजी ठाण्यातील एमआयडीसी सिडको पोलिसांनी परीक्षा केंद्राजवळून काही व्यक्तींना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे प्रश्नांची व उत्तरांची छायाचित्रे मिळून आली होती.संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अशी अनेक प्रकरणे राज्यात ठिकठिकाणी  उघडकीस आली, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. 

 

टॅग्स :examपरीक्षाCourtन्यायालय