शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

महिनाभरापूर्वी परवाना घेणाऱ्या व्यापारी व अडत्यांना मताधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 01:18 IST

बाजार समितीमध्ये किमान महिनाभरापूर्वी परवाना घेतला असेल व किमान १० हजार रुपयांचा व्यवहार केला असेल तर असे व्यापारी व अडत्यांना आता बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करता येईल. यासंबंधीचे सुधारणा विधेयक बुधवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देविधेयक विधानसभेत मंजूर : सरकारच्या हेतूवर विरोधकांना शंका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाजार समितीमध्ये किमान महिनाभरापूर्वी परवाना घेतला असेल व किमान १० हजार रुपयांचा व्यवहार केला असेल तर असे व्यापारी व अडत्यांना आता बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करता येईल. यासंबंधीचे सुधारणा विधेयक बुधवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले. यापूर्वी व्यापारी व अडत्यांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी किमान दोन वर्षांपूर्वीचा परवाना असणे आवश्यक होते. या सुधारणेच्या आडून भाजपाला आपल्या विचारांच्या व्यापारी मतदारांची संख्या वाढवायची असल्याचा आरोप विरोधकांनी केला.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ यात आणखी सुधारणा करण्यासाठी मांडण्यात आलेल्या या विधेयकावर बोलताना सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या लिलावात निकोप स्पर्धा व्हावी व शेतमालाला जास्तीत जास्त भाव मिळावा म्हणून अधिकाधिक व्यापारी व अडत्यांना परवाने देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. व्यापारी व अडत्यांमधून दोन सदस्य बाजार समितीवर निवडून दिले जातात. मात्र, किमान दोन वर्षांपूर्वीचा परवाना असलेल्यांनाच मताधिकार दिल्यामुळे बरेच व्यापारी व अडते यांना मतदानापासून वंचित रहावे लागत होते. त्यामुळे यात सुधारणा करीत एक महिन्याची अट घालण्यात आली आहे. मूठभर लोक परवाने घेत होते पण व्यवहार करीत नव्हते. त्यामुळे स्पर्धा वाढविण्यासाठी ही सुधारणा करण्यात आली आहे. मुंबईत ही सुधारणा लागू होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे विधेयक आणलेले नाही, असा दावा करीत त्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले.विरोधकांनी या सुधारणेला कडाडून विरोध करीत सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील म्हणाले, निवडणुकांचा खर्च बाजार समित्यांवर न टाकता सरकारने वहन करणे आवश्यक आहे. एक महिनाभरापूर्वी दहा हजार भरून परवाना घेऊन येणारे व्यापारी भविष्यात अडचणीची परिस्थिती निर्माण करू शकतात. बाजार समित्या कर्जबाजारी होतील. बाजार समित्या बुडविण्याचा हा प्रकार आहे. काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांनी आपल्या विचाराच्या व्यापारी मतदारांची संख्या वाढवून बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी सरकारतर्फे हा खटाटोप केला जात असल्याचा आरोप केला. वीरेंद्र जगताप म्हणाले, मताधिकारासाठी अडत्यांना फक्त १० हजार रुपयांची हमीठेव घेण्यात येणार आहे. उद्या शेतकऱ्यांचा माल खरेदी करून पैसे न देताच व्यापारी पळाला तर याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला.शशिकांत शिंदे म्हणाले, दोन वर्षांची अट रद्द करून महिनाभराची केली जात आहे. हे संशयास्पद आहे. यामुळे ज्याचा बाजार समितीशी संबंध नाही तो देखील निवडणूक लागताना पाहून महिनाभरापूर्वी परवाना काढेल व निवडणूक लढेल. तुम्ही आपल्या लोकांच्या सोयीसाठी ही सुधारणा करीत आहात, असा आरोप करीत त्यांनी विधेयकाला विरोध केला.हमी भाव न देणाऱ्यांचा परवाना रद्द करणार बाजार समित्यांमधील तोट्याला संचालक जबाबदार आहे. बाजार समिती व व्यापाऱ्यांचे लागेबांधे आहेत. त्यामुळेच शेतकऱ्याला हमी भावापेक्षा कमी भाव मिळूनही बाजार समित्यांनी कारवाई केलेली नाही. यापुढे थेट सरकारच यात हस्तक्षेप करून परवाने रद्द करण्याचे विधेयक आणेल, असेही देशमुख यांनी सांगितले.खडसेंचा सरकारला घरचा अहेर तूर आणि चणा खरेदी केल्यानंतर बाजार समित्यांना पैसे देत नाही, असे सरकार म्हणते. मग बाजार समित्या जगणार कशा, असा सवाल करीत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा अहेर दिलाय. बाजार समित्यांना निवडणुकांचा खर्च झेपणार नाही. त्यांच्याजवळ पगारासाठी पैसे नाहीत. तुमच्या डोक्यात लोकशाही गेली असेल तर तुमच्या पैशातून बाजार समितीच्या निवडणूक घ्या, असा टोलाही त्यांनी लगावला.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८vidhan sabhaविधानसभा