शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज काढून सिमेंट रस्ते ! मनपा २०० कोटींचे कर्ज घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 23:37 IST

१५० कोटींचे विशेष अनुदान दिल्यानंतर राज्य सरकारने जीएसटी अनुदानात वाढ केली. त्यानंतरही विकास कामांसाठी कर्ज घेण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. सिमेंट रस्त्यांसाठी बॅक ऑफ महराष्ट्रकडून ९.७५ टक्के व्याज दराने २०० कोटींचे कर्ज घेणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.

ठळक मुद्देअमृत,मेट्रो मॉलचे निर्माण करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १५० कोटींचे विशेष अनुदान दिल्यानंतर राज्य सरकारने जीएसटी अनुदानात वाढ केली. त्यानंतरही विकास कामांसाठी कर्ज घेण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. सिमेंट रस्त्यांसाठी बॅक ऑफ महराष्ट्रकडून ९.७५ टक्के व्याज दराने २०० कोटींचे कर्ज घेणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.प्रस्तावानुसार शहरातील सिमेंट रस्त्यांच्या टप्पा -२ व टप्पा-३ मधील कामे करण्यासाठी १२८ कोटी उपलब्ध केले जातील. तसेच पाणीपुरवटा योजना ‘अमृत’, मेट्रो मॉल, बुधवार बाजार, सक्करदरा बाजाराचा विकास करण्यासाठी कर्जातून निधी उपलब्ध केला जाणार आहे. विशेष म्हणजे कर्ज घेताना करण्यात आलेल्या करारानुसार ज्या प्रकल्पासाठी कर्ज घेतले जाईल. त्याच प्रकल्पावर ही रक्कम खर्च करावयाची आहे. या कर्जासाठी सरकारकडून कोणत्याही प्रकारची हमी घेण्याची गरज नाही. यासाठी महापालिका व बॅक ऑफ महाराष्ट्र यांच्यात एस्क्रो खात्यासाठी करार कराण्यात आला आहे.महापालिका प्रशासनातर्फे कर्ज घेण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून सुरू आहे. अखेर डिसेंबर २०१८ मध्ये बॅक ऑफ महाराष्ट्र यांच्याशी करार करण्यात आला. व्याज दरात कपात करावी यासाठी चर्चा सुरू होती. परंतु बँक निर्धारित व्याज दर कमी करण्यास राजी झालेली नाही. त्यामुळे निर्धारित दराने व्याज द्यावे लागणार आहे.सौर ऊर्जेवर भरमहापालिकेच्या ज्या इमारतीत मीटरनिहाय एक किलोवॅट वा त्याहून अधिक वीज वापर आहे. अशा इमारती वा कार्यालयात सौर ऊर्जा संयत्र लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पाणीपुरवठा केंद्रातही सौरऊ र्जेचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च होणाऱ्या वीज बचतीतून केला जाणार आहे. यात सौरऊ र्जा संयत्र उपलब्ध करणे, लावणे, कार्यान्वित करणे, आदी कामे २४० महिन्यात परतफेडीच्या आधारावर उभारण्यात येणार आहे. यासाठी शर्ती व अटी निश्चित करण्यात आलेल्या आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfundsनिधी