शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 20:40 IST

रुग्णांचे हित जपणे सर्वात आवश्यक असल्याने जिल्ह्यातील विनानोंदणीकृत खासगी व बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रुग्णांचे हित जपणे सर्वात आवश्यक असल्याने जिल्ह्यातील विनानोंदणीकृत खासगी व बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात बोगस वैद्यकीय व्यवसायींना आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करणाऱ्या जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर तसेच आरोग्य व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, अनेक बोगस वैद्यकीय व्यावसायिक शहर व ग्रामीण भागांत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बेकायदेशीरपणे लावून रूग्णांची फसवणूक करताना आढळतात. अशांवर संबंधित यंत्रणांनी त्वरित कडक कारवाई करावी. ग्रामीण व शहरी हद्दीतील बोगस वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती यंत्रणांनी समितीसमोर वेळोवेळी ठेवणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी तत्परतेने याची नोंद घ्यावी. अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कोणतीही व्यक्ती बोगस वैद्यकीय व्यवसाय करणार नाही याची खात्री करावी. विनानोंदणी वैद्यकीय व्यवसाय करणारे आढळून आल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत. बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध रीतसर कार्यवाही पोलिसांनी करावी, न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांचा नियमित आढावा घेण्यात यावा. पॅथॉलॉजी लॅबची नोंदणी असणे गरजेचे असून यासंदर्भात संबंधित विभागाने तपासणी करण्याचे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी मुदगल यांनी दिले.बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरूद्ध २०१७ मध्ये ४ तर २०१८ मध्ये २ गुन्हे दाखल करण्यात आले असून तालुकास्तरीय समितीकडे दाखल झालेल्या तक्रारींवरही कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयdoctorडॉक्टर