शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

संतोष आंबेकरची ओळखपरेड घ्या

By admin | Updated: June 17, 2014 00:49 IST

श्रद्धानंदपेठ या पॉश वस्तीतील बंगल्यावरील अवैध ताब्याच्या प्रकरणात शहरातील कुख्यात डॉन संतोष शशिकांत आंबेकरची दोन दिवसांत ओळखपरेड घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश

हायकोर्टाचे आदेश : बंगल्यावरील अवैध ताब्याचे प्रकरणनागपूर : श्रद्धानंदपेठ या पॉश वस्तीतील बंगल्यावरील अवैध ताब्याच्या प्रकरणात शहरातील कुख्यात डॉन संतोष शशिकांत आंबेकरची दोन दिवसांत ओळखपरेड घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.या प्रकरणात जामीन मिळण्यासाठी आंबेकरने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. आज, सोमवारी न्यायमूर्ती एम.एल. तहलियानी यांच्यासमक्ष अर्जावर सुनावणी झाली. दरम्यान, आंबेकरला ओळखपरेड घेतली नसतानाही आरोपी करण्यात आल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. परिणामी न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले आहेत. पराग रामचंद्र गोंधळेकर असे फिर्यादीचे नाव असून ते अमेरिकेत राहतात. श्रद्धानंदपेठ येथील १५ व्या क्रमांकाच्या प्लॉटवर त्यांचा वडिलोपार्जित बंगला आहे. त्यांची बहीण रश्मी व आई बंगल्यात राहात होत्या. त्यांच्या आईला कर्करोग होता. यामुळे ते मार्च-२०११ मध्ये आईला उपचारासाठी अमेरिकेत घेऊन गेले. आॅक्टोबर-२०१२ मध्ये आईचे निधन झाले. यानंतर फेब्रुवारी-२०१३ मध्ये रश्मी नागपुरात आल्या असता त्यांना बंगल्यापुढे संजय कन्स्ट्रक्शनचा फलक लागलेला दिसला. बंगल्यात १० ते १२ गुंड राहात होते. त्यांनी रश्मींना धमकावून परत पाठविले. रश्मीने ही माहिती पराग यांना दिली. पराग मे-२०१३ मध्ये नागपुरात आले असता त्यांना एकंदरीत परिस्थिती पाहून धक्का बसला. बंगल्याजवळ गुंडांचा घोळका असल्याने ते काहीच बोलले नाही. परिसरातील नागरिकांनी एक व्यक्ती पॉश कारने बंगल्यात येत-जात असल्याची माहिती दिली. काही दिवसांनी एका प्रकरणात संतोष आंबेकरचे छायाचित्र वर्तमानपत्रात प्रकाशित झाले. बंगल्यात कारने येणारा व्यक्ती हाच होता, असे नागरिकांनी पराग यांना सांगितले. यावरून आंबेकरला प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.पराग यांनी गेल्या ११ फेब्रुवारी रोजी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यातील माहितीनुसार, पांढराबोडीतील संजय फातोडेने गुंडांच्या मदतीने बंगल्याचा ताबा घेतला. घराच्या चारही बाजूने संमतीशिवाय पत्र्याचे शेड उभे केले. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अर्जदारातर्फे आर. के. तिवारी, तर शासनातर्फे एपीपी राशी देशपांडे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)