शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना १५ डिसेंबरपर्यंत सेवेत घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:55 IST

मौदा येथील नॅशनल थर्मल पॉवर कॉपोर्रेशन (एनटीपीसी) प्रकल्पात ज्यांच्या जमिनी व घरे गेली आहेत व ज्यांना जिल्हाधिकाºयांकडून प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळाले आहे,...

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे एनटीपीसीला निर्देश : मौद्यातील प्रकल्पगस्तांना न्याय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मौदा येथील नॅशनल थर्मल पॉवर कॉपोर्रेशन (एनटीपीसी) प्रकल्पात ज्यांच्या जमिनी व घरे गेली आहेत व ज्यांना जिल्हाधिकाºयांकडून प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळाले आहे, अशांना येत्या १५ डिसेंबरपर्यत एनटीपीसीने सेवेत सामावून घ्यावे, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एनटीपीसीला दिले.मौदा येथे शनिवारी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी एनटीपीसीच्या अधिकाºयांची बैठक घेतली. तीत एनटीपीसीचे महाव्यवस्थापक नंदा, राजकुमार, अन्य वरिष्ठ अधिकारी व प्रकल्पग्रस्त कुटुंबांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांपैकी ६० ते ७० जणांना अजूनही नोकरी मिळालेली नाही. प्रकल्पग्रस्तांना डावलून बाहेरच्या लोकांना नोकरी दिली जात आहे, अशा तक्रारी प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी केल्या. यावर जिल्हाधिकाºयांचे प्रकल्पग्रस्त म्हणून प्रमाणपत्र असलेल्यांनी तहसिलदार आणि खंडविकास अधिकारी यांच्याकडे जाऊन नोंदणी करावी व या दोन्ही अधिकाºयांनी प्रकल्पग्रस्तांना आधी नोकरी मिळावी याची जबाबदारी पार पाडावी, अशा सूचनाही बावनकुळे यांनी दिल्या.मध्यंतरीच्या काळात एनटीपीसीने १०२ जागा काढल्या होत्या. पण नियुक्त्या होत असतानाच कुणीतरी न्यायालयात गेले व स्थगिती आली. यात काही प्रकल्पग्रस्तांचाही समावेश आहे. स्थानिकांपैकी १३२२ जणांना विविध प्रकारच्या कामावर घेण्यात आल्याची माहिती एनटीपीसीच्या अधिकाºयांनी दिली. या प्रकल्पात बेरोजगारांच्या सात सहकारी सोसायटी नोंदणीकृत आहेत. पण त्यांना काम दिले जात नसल्याच्या तक्रारीवर ऊर्जामंत्र्यांनी या सर्व सोसायट्यांची बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे निर्देश दिले. प्रकल्पग्रस्त आणि प्रदूषणाच्या सीमेत असलेल्या गावातील विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी आरक्षण मिळावे यासाठी एनटीपीसीने कारवाई करावी. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या विद्यार्थ्यांनाही शाळेत ५० टक्के फी सवलतीची मागणी यावेळी पुढे आली. प्रकल्पग्रस्तांना अजून हेल्थ कार्ड मिळाले नाही. अशा ७८२ कुटुंबाना लगेच हेल्थकार्ड देण्याची कारवाई करण्याचेही पालकमंत्र्यांनी सूचित केले.कुंभारी गावात७५ मे.वॉ.चा सौर प्रकल्प उभाराभविष्यात एनटीपीसीच्या वीजनिर्मितीच्या वाढीव युनिटसाठी प्रकल्पाजवळील कुंभारी गावाच्या जमिनीचा प्रश्नासंदर्भात बोलताना ऊजार्मंत्री बावनकुळे म्हणाले, कुंभारी येथील ३०० एकर जागेवर एनटीपीसीने ७५ मेगावॉटचा नवीन सौर ऊर्जा प्रकल्प उभारावा. यासाठी आपण एनटीपीसीचे अध्यक्ष आणि केंद्र शासनाला विनंती करू. ही वीज विकत घेण्याचा करार महाराष्ट्र शासन करेल. यामुळे या भागातील शेतकºयांना दिवसा वीज उपलब्ध होईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.