शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अकोला विमानतळाच्या विस्तारीकरणावर भूमिका सांगा

By admin | Updated: December 25, 2014 00:23 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अकोला येथील शिवनी विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश भारतीय विमानतळ प्राधिकरणला दिलेत.

हायकोर्ट : विमानतळ प्राधिकरणला मागितले उत्तरनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अकोला येथील शिवनी विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश भारतीय विमानतळ प्राधिकरणला दिलेत.न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष प्रकरणावर सुनावणी झाली. प्राधिकरणचे नागपूर येथील संचालक मनीषकुमार यांनी व्यक्तीश: उपस्थित राहून विमानतळाच्या विस्तारीकरणाबाबत सकारात्मक भूमिका मांडली. परंतु, प्राधिकरणने यापूर्वी राज्य शासनाला पाठविलेल्या दोन पत्रांमध्ये परस्पर भिन्न मते नोंदविण्यात आली आहे. एका पत्रात विकासकामांसाठी जमीनच उपलब्ध नसल्यामुळे विमानतळाचा विस्तार करणे अशक्य असल्याचे कळविण्यात आले आहे, तर दुसऱ्या पत्रात विमानतळाच्या विस्तारास हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने प्राधिकरणलाही प्रकरणात प्रतिवादी करण्यास अनुमती दिली होती.विमानतळाच्या विस्तारीकरणाविरुद्ध विदर्भ असोसिएशन फॉर रिसर्च टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट इन अ‍ॅग्रीकल्चरल अँड रुरल सेक्टरचे अध्यक्ष डॉ. बलवंत बाठकल यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. राज्य शासनाने ४ मार्च २०१३ रोजी ‘जीआर’ काढून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला शिवनी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ६०.६८ हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. ही जमीन कृषी संशोधनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. जमिनीवर विविध विभागाच्या इमारती, सिंचन प्रणाली, तलाव, विहिरी, फळझाडे व कृषिसंबंधित लागवड केलेली आहे. शासनाने जमीन हस्तांतरणाचा ‘जीआर’ काढताना होणाऱ्या नुकसानीचा विचारच केलेला नाही, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी बाजू मांडली.