नागपूर : राज्यात कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता इयत्ता नववीच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने व दहावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याची मागणी विदर्भ टॅक्सपेयर्स असोसिएशनचे अध्यक्ष तेजेंदरसिंह रेणू यांनी सीबीएसई बोर्डाकडे केली आहे. संघटनेचे सीबीएसईचे अध्यक्ष मनोज आहुजा, सचिव अनुराग त्रिपाठी व पुण्याचे निदेशक महेश धर्माधिकारी यांना पत्र मागणीचे पत्र पाठविले आहे. विदर्भ टॅक्सपेयर्स असोसिएशनच्यानुसार २०२०-२१ हे सत्र समाप्त होत आहे. त्यामुळे सीबीएसईने लवकरात लवकर परीक्षेची घोषणा करणे आवश्यक आहे. परीक्षेवरून विद्यार्थी व पालक चिंतेत आहे. वाढत्या संक्रमणामुळे पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास इच्छुक नाही. अशा परिस्थितीत ऑफलाईन परीक्षा घेणे योग्य आहे. ऑनलाईन परीक्षा घेतल्यास सुरक्षित अंतराच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही. विद्यार्थीही घरी सुरक्षित राहील.
नवव्या वर्गाच्या परीक्षा ऑनलाईन घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:10 IST