शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विमलाश्रमाला स्वावलंबी बनविण्यासाठी उपाय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 00:14 IST

राज्याचा मुख्यमंत्री म्हणून प्रत्येकाची त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा असते. कुणी आर्थिक मदतीसाठी तर कुणी अनुदानासाठी त्यांच्यापर्यंत पोहचत असतो. परंतू शनिवारी मुख्यमंत्र्यांना प्राप्त झालेले एक निवेदन वेगळे होते. आयुष्यभर शासनाचे अनुदान किंवा कुठलीही आर्थिक मदत न घेता केवळ जनसहकार्यातून बाणेदारपणे वंचित मुलांसाठी भक्कम आधार निर्माण करणाऱ्या रामभाऊ इंगोले यांचे हे निवेदन होते. विमलाश्रमातील मुले इतरांच्या मदतीवर राहण्यापेक्षा कायमस्वरूपी स्वावलंबी होतील, असे काही उपाय करा असे निवेदन सादर केले. या निवेदनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही गहिवरले व थोड्या वेळ स्तब्ध झाले. मी काहीतरी करतो, एवढा विश्वास त्यांनी दिला.

ठळक मुद्देरामभाऊ इंगोले यांच्या निवेदनाने मुख्यमंत्रीही स्तब्ध

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्याचा मुख्यमंत्री म्हणून प्रत्येकाची त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा असते. कुणी आर्थिक मदतीसाठी तर कुणी अनुदानासाठी त्यांच्यापर्यंत पोहचत असतो. परंतू शनिवारी मुख्यमंत्र्यांना प्राप्त झालेले एक निवेदन वेगळे होते. आयुष्यभर शासनाचे अनुदान किंवा कुठलीही आर्थिक मदत न घेता केवळ जनसहकार्यातून बाणेदारपणे वंचित मुलांसाठी भक्कम आधार निर्माण करणाऱ्या रामभाऊ इंगोले यांचे हे निवेदन होते. विमलाश्रमातील मुले इतरांच्या मदतीवर राहण्यापेक्षा कायमस्वरूपी स्वावलंबी होतील, असे काही उपाय करा असे निवेदन सादर केले. या निवेदनामुळे मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीसही गहिवरले व थोड्या वेळ स्तब्ध झाले. मी काहीतरी करतो, एवढा विश्वास त्यांनी दिला.रामभाऊ इंगोले म्हणजे ‘जे का रंजले गांजले...’ ही संतांची उक्ती स्वीकारलेले असामान्य व्यक्तिमत्त्व. समाजाकडून तिरस्कार, अवहेलनेशिवाय काहीच न मिळालेल्या वस्तीतील मुलांना रामभाऊंनी पोटाशी कवटाळले. त्यांना नुसतीच माया दिली नाही तर समाजाचा जबाबदार आणि संवेदनशील नागरिक बनविण्यासाठी परिश्रम घेतले. यासाठी प्रसंगी त्यांना घरातून विरोध पत्करून घर सोडावे लागले आणि पांढरपेशा समाजाकडून उपेक्षाही सहन करावी लागली. पण त्यांनी कशाचीही पर्वा न करता आपले आयुष्य या मुलांसाठी समर्पित केले. या तिरस्कृत मुलांना परवड सहन करावी लागू नये म्हणून कायमस्वरूपी ‘विमलाश्रम’चा भक्कम आधारवड उभा केला. यासाठी कधी शासनाकडे अनुदान मागितले नाही की कुणाकडे मदतीसाठी पदर पसरला नाही. त्यांच्याकडे संपत्ती होती असे नाही. संत गाडगेबाबाप्रमाणे फाटक्या झोळीच्या या औलियाने केवळ संवेदनशील सहकाऱ्यांनी स्वखुशीने पुढे केलेल्या मदतीच्या आधारावरच हे विश्व उभे केले आहे. गेल्या २५ वर्षापासून ते चालविले आहे.खरतर आज रामभाऊ आणि त्यांचा विमलाश्रम मोठ्या कठीण परिस्थितीतून जात आहे. सामाजिक काम करता करता त्यांच्या विमलाश्रमावर ८-१० लाख रुपये कर्जाचा डोंगर उभा झाला आहे. मुलांच्या रोजच्या आवश्यक गरजा पूर्ण करणेही मुश्किल झाले आहे. दुसरीकडे त्यांनी खाणीतील मजुरांच्या मुलांसाठी उभारलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न उभा ठाकला आहे. यावेळी त्यांच्या विमलाश्रमासाठी हात पुढे करण्याची नितांत गरज आहे. मात्र तरीही या भावनिक माणसाने मुख्यमंत्र्यांना अनुदान विचारले नाही की मदत मागितली नाही. रामभाऊ आता वयानेही थकले आहेत. त्यामुळे विमलाश्रमाच्या मुलांचे काय होईल, ही चिंता त्यांना सतावत आहे. मात्र त्यासाठी मदत किंवा अनुदान मागण्यापेक्षा ही मुले स्वावलंबी होतील, त्यांना रोजगार मिळेल अशी काही उपाययोजना करा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. काहीतरी आर्थिक स्रोत निर्माण व्हावा, मुलांना कायमस्वरुपी रोजगार मिळेल अशा व्यवसायाबाबतही त्यांनी सुचविले. सरकारतर्फे मुख्यमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, असे निवेदन त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक विचार करण्याचा विश्वास त्यांना दिला.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस