शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एकमुश्त कर घ्या, पण चिल्लर व्यापाऱ्यांना सरकारी झंझटीपासून मुक्त करा

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 1, 2024 20:31 IST

प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन

नागपूर : चिल्लर किराणा दुकान नव्याने सुरू करताना व्यापाऱ्याला अन्न, गुमाश्ता, वैधमापनशास्त्र, नोंदणी, कामगार विभाग, धान्य आणि अन्य विभागाचे परवाने घ्यावे लागतात. यातील एखाद्या विभागाच्या नियमाचे नजरचुकीने पालन न झाल्यास व्यापाऱ्याला नोटीस येतो किंवा प्रसंगी दंड आकारला जातो. व्यापाऱ्याला अनेकदा व्यवसाय बंद ठेवून विभागाच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान होते आणि मानसिक त्रास सोसावा लागते.

एवढेच नव्हे तर काही विभागाच्या परवान्याच्या नूतनीकरणाला उशीर झाल्यास दरदिवशी १०० रुपये दंड भरावा लागतो. व्हॅट आणि एलबीटी दंड प्रकरणांमध्ये असोसिएशनने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आधीच भेट घेतली आहे. त्यानंतरही चिल्लर किराणा व्यापाऱ्यांच्या समस्या कायम आहेत. तो वेळोवेळी आर्थिकदृष्ट्या लुटल्या जात आहे. त्यामुळे  राज्यातील चिल्लर किराणा दुकानदारांसाठी एक खिडकी परवाना प्रणाली बंधनकारक करावी, अशी असोसिएशनची अनेक वर्षांपासून राज्य सरकारकडे मागणी आहे. राजकर्त्यांना याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

या आहेत अपेक्षा 

- वितरकाकडून माल खरेदी करताना चिल्लर किराणा व्यापाऱ्याने आधीच व्हॅटचा भरणा केल्यानंतरही राज्य जीएसटी विभागाकडून व्यापाऱ्यांना नोटीस आल्या. या प्रकरणी विभागाने वितरकाला दोषी धरावे.

- जीएसटी करयुक्त मालाचे चुकारे धनादेशाद्वारे होत असल्याने राज्य जीएसटी विभागाने चिल्लर किराणा दुकानदारांना दोषी धरू नये.- माल विक्रीसाठी ज्या ठिकाणाहून निघतो, त्याच ठिकाणी विभागाने करवसुली करावी. 

- विनाझंझट व्यापारासाठी राज्य सरकारने एकमुश्त कर आकारावा आणि एक खिडकी परवाना प्रणाली सुरू करावी.