शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
2
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
3
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
4
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
5
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
6
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
7
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
8
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
9
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
10
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
11
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
12
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
13
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
14
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
15
पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
16
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
17
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
18
कधी काळी सचिन तेंडुलकरची झोप उडवणारा गोलंदाज; आज क्रूझ शिपवर गाणी गाऊन उदरनिर्वाह
19
कल्याण-डोंबिवलीत महायुतीने मतदानाआधीच अर्धी लढाई जिंकली, तब्बल १९ उमेदवार बिनविरोध
20
Jalgaon Municipal Election 2026: भाजपा-शिंदेसेनेचा विजयाचा 'षटकार'! युतीचे १२ उमेदवार बिनविरोध, वाचा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाच्या प्रस्तावावर निर्णय घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:03 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांना शिक्षक समकक्ष वर्गाचे लाभ देऊन वयाच्या ६० वर्षापर्यंत सेवेत कायम ठेवायचे की, शिक्षकेतर वर्गातील नियमानुसार वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त करायचे यावर एक आठवड्यात निर्णय घेण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकारला दिला.

ठळक मुद्देमेश्राम यांच्या सेवानिवृत्तीचे प्रकरण : आज होणार अधिकृत निवृत्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम यांना शिक्षक समकक्ष वर्गाचे लाभ देऊन वयाच्या ६० वर्षापर्यंत सेवेत कायम ठेवायचे की, शिक्षकेतर वर्गातील नियमानुसार वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त करायचे यावर एक आठवड्यात निर्णय घेण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकारला दिला.गेल्या २२ मे रोजी नागपूर विद्यापीठाने मेश्राम यांना शिक्षक समकक्ष वर्गाचे लाभ देऊन वयाच्या ६० वर्षापर्यंत सेवेत कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव पाठविला आहे. सध्या राज्य सरकारने मेश्राम यांना शिक्षकेतर वर्गात टाकले आहे. त्यानुसार त्यांना वयाच्या ५८ व्या वर्षी म्हणजे, उद्या ३० जून रोजी सेवानिवृत्त व्हावे लागणार आहे. परिणामी, मेश्राम यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून राज्य सरकारला नागपूर विद्यापीठाच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात यावे अशी विनंती केली होती. तसेच, राज्य सरकारचा निर्णय होतपर्यंत नागपूर विद्यापीठाने आपल्याला सेवानिवृत्त करू नये, असे त्यांचे म्हणणे होते. सुनावणीदरम्यान, नागपूर विद्यापीठाने मेश्राम यांना सेवेत कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केली, पण राज्य सरकारने यासाठी त्यांचा निर्णय बंधनकारक असल्याचे सांगितले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने राज्य सरकारला विद्यापीठाच्या प्रस्तावावर एक आठवड्यात निर्णय घेण्याचा आदेश देऊन प्रकरणावर १३ जुलै रोजी अंतिम सुनावणी निश्चित केली. न्यायालयाने मेश्राम यांना पदावर कायम ठेवायचे किंवा नाही यावर काहीच मतप्रदर्शन केले नाही. परिणामी, आता चेंडू राज्य सरकार व नागपूर विद्यापीठाच्या पुढ्यात असून ते उद्या, ३० जून रोजी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. मेश्राम यांच्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर तर, नागपूर विद्यापीठातर्फे अ‍ॅड. राज वाकोडे यांनी बाजू मांडली.काय आहे प्रकरण ?राज्य सरकार सुरुवातीला मेश्राम यांना शिक्षक समकक्ष वर्गातील लाभ देत होते. परंतु, वित्त व लेखा अधिकारीपदी पुनर्नियुक्ती झाल्यानंतर त्यांना शिक्षकेतर वर्गात टाकण्यात आले. शिक्षक समकक्ष वर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० तर, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ आहे. तसेच, वेतन श्रेणी व अन्य लाभातही तफावत आहे. त्यामुळे मेश्राम यांनी वित्त व लेखा अधिकारी पदाकरिता ३० मे २०१४ पासून व कुलसचिव पदाकरिता २५ मे २०१५ पासून ३७,४००-६७,००० वेतनश्रेणी व १० हजार रुपये ग्रेड पे मिळावा आणि १२ आॅगस्ट २००९ रोजीच्या शासन निर्णयानुसार इतर सर्व लाभ मिळावेत, यासाठी २०१६ मध्ये उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. ती याचिका अद्यापही प्रलंबित आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये वेतनश्रेणी व सेवानिवृत्ती वयाच्या बाबतीत भेदभाव करणाऱ्या २२ मार्च २०१६ रोजीच्या आदेशावर स्थगिती देण्याची मागणीही त्या याचिकेत करण्यात आली आहे. सेवानिवृत्तीचा दिवस जवळ आल्यामुळे ही याचिका लवकर निकाली काढण्यात यावी असा विनंती अर्ज मेश्राम यांनी न्यायालयात दाखल केला होता. १८ जून २०१८ रोजी न्यायालयाने तो अर्ज खारीज केला. परिणामी मेश्राम यांनी पदावर कायम राहण्यासाठी हा नवीन अर्ज दाखल केला आहे.

 

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठHigh Courtउच्च न्यायालय