लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पक्ष्यांबद्दल माणसांना कायमच कुतूहल राहिले आहे. अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच पक्ष्यांची किलबिल आवडत असते. परंतु हेच पक्षी रखरखत्या उन्हात जेव्हा दाणे-पाण्यावाचून तडफडत मरतात तेव्हा मात्र खूप वेदना होतात. हे चित्र बदलण्यासाठी महात्मा बहुद्देशीय जनकल्याण संस्थेने पुढाकार घेतला असून या संस्थेचे सदस्य स्वखर्चाने जलपात्र वाटपाचा विधायक उपक्रम राबवीत आहेत. गुरुवारी त्यांनी लोकमत कार्यालयातही या जलपात्रांचे वाटप केले. यावेळी संस्थेच्या हंसाबेन पागडाल व त्यांना सहकार्य करणाऱ्या डॉ. जयश्री चौधरी, मिनी मेश्राम व विजया गोरे उपस्थित होत्या. महात्मा बहुद्देशीय जनकल्याण संस्था ही एक सामाजिक संस्था आहे. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सात महिला-पुरुषांनी एकत्र येत या संस्थेची स्थापना केली आहे. नागपूर शहराचे तापमान सर्वश्रुत आहे. एकीकडे उन्हाच्या प्रचंड झळा आणि दुपारी वाढत जाणारा उन्हाचा कडाका अशा वातावरणात पक्ष्यांना पाणी, तसेच खाद्य वेळेवर मिळत नसल्याने अनेकदा हे पक्षी तडफडून प्राण सोडतात. त्यांचे निष्प्राण देह झाडाखाली पडलेले असतात. हे चित्र या संस्थेच्या लोकांनीही बघितले व पक्ष्यांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी स्वखर्चाने जलपात्र विकत घेतले व ते शहरातील विविध संस्थांना मोफत वाटले. मागच्या ५ वर्षांपासून त्यांची ही भूतदया सुरू आहे. संस्थेच्या या विधायक कार्याला छगन पागडाल, विजय बाजारे, ज्योत्स्ना बाजारे, जतीन पागडाल, सुरेश भापकर व सुमीत बाजारे यांचे सहकार्य लाभत आहे.
जलपात्र घ्या, पक्ष्यांना ग्लासभर पाणी द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:54 IST
पक्ष्यांबद्दल माणसांना कायमच कुतूहल राहिले आहे. अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच पक्ष्यांची किलबिल आवडत असते. परंतु हेच पक्षी रखरखत्या उन्हात जेव्हा दाणे-पाण्यावाचून तडफडत मरतात तेव्हा मात्र खूप वेदना होतात. हे चित्र बदलण्यासाठी महात्मा बहुद्देशीय जनकल्याण संस्थेने पुढाकार घेतला असून या संस्थेचे सदस्य स्वखर्चाने जलपात्र वाटपाचा विधायक उपक्रम राबवीत आहेत.
जलपात्र घ्या, पक्ष्यांना ग्लासभर पाणी द्या!
ठळक मुद्देविधायक उपक्रम : महात्मा बहुद्देशीय जनकल्याण संस्थेचा उपक्रम