शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

संमिश्र हवामानात त्वचेची घ्या अशी काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 11:27 IST

ऋतुमानानुसार वातावरणातील बदलांचा सर्वात प्रथम परिणाम त्वचेवर दिसून येतो. हिवाळ्यात त्वचा विकार वाढत असलेतरी सध्या सुरू असलेल्या थंडीच्या कमी जास्त प्रभावामुळे त्वचा विकाराचे सर्वाधिक रुग्ण दिसून येत आहे.

ठळक मुद्देकोरडेपणा, त्वचा फुटणे, खरखरीत होणे, खाज सुटणे आदींचे रुग्ण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऋतुमानानुसार वातावरणातील बदलांचा सर्वात प्रथम परिणाम त्वचेवर दिसून येतो. हिवाळ्यात त्वचा विकार वाढत असलेतरी सध्या सुरू असलेल्या थंडीच्या कमी जास्त प्रभावामुळे त्वचा विकाराचे सर्वाधिक रुग्ण दिसून येत आहे. या बदलत्या वातावरणामुळे त्वचा कोरडी पडणे, त्वचा फुटणे, खरखरीत होणे, खाज सुटणे आदी समस्या घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे प्रसिद्ध त्वचाविकार विशेषज्ञ डॉ. नितीन बरडे यांचे म्हणणे आहे.उन्हाळ्यात त्वचा घामाला नियमितपणे शरीराबाहेर फेकण्याचे काम करते. यामुळे त्वचेच्या तक्रारी उद्भवत नाहीत. घामामुळे त्वचेची रंध्रे उघडी राहतात. विशेषत: आपण जे चरबीयुक्त पदार्थ खातो. त्यांचा तेलकटपणा रंध्रातून बाहेर पडतो, त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही. परंतु, हिवाळ्यात त्वचेतून घाम बाहेर येण्याची प्रक्रिया मंदावते किंवा बंद होत जाते. त्यामुळे त्वचेचे विकार वाढत असल्याचे डॉ. बरडे यांनी सांगितले. त्यांच्यानुसार सध्या कमी जास्त होणाºया थंडीमुळे त्वचा विकाराचे रुग्ण वाढले आहे. जर निरोगी, सुंदर त्वचा हवी असेल तर थंडीमुळे शरीरात वाढणारा कोरडेपणा कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे.

सकाळ-सायंकाळी मॉईश्चरायझर लावाडॉ. बरडे म्हणाले, बदलत्या वातावरणामुळे अनेकवेळा थंडी जाणवत नसली तरी सकाळी व सायंकाळी त्वचेवर मॉईश्चरायझर लावायला हवे. विशेष म्हणजे, चेहरा धुतल्यानंतर लगेच मॉईश्चरायझर लावल्यास फायदा होतो. आंघोळीनंतर त्वचेला टॉवेलने रगडू नये. साबणाऐवजी ‘क्लिंजर’ वापरावे. ‘स्क्रब’ क्रिमचा वापर टाळावा. ‘हिटर’मुळे त्वचा कोरडी पडते. यामुळे याबाबत काळजी घ्यावी.

भरपूर पाणी प्याहिवाळ्यात आहाराकडेही योग्य लक्ष द्यायला हवे. आहारात स्निग्ध पदार्थ, भरपूर ताजी फळे, शहाळ्याचे पाणी, हिरव्या पालेभाज्या आणि सुका मेव्याचा समावेश करायला हवा असे सांगत डॉ. बरडे म्हणाले, थंडीमुळे अनेकजण पाणी कमी पितात. याचा परिणाम आरोग्यावर होतो. यामुळे ऋतु कुठलाही असो त्वचा निरोगी ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्यायला हवे.

ओठांची विशेष काळजी घ्याहिवाळ्यात ओठांचा ओलसरपणा टिकून ठेवणे आवश्यक आहे. ओठाची त्वचा खूप नाजूक असल्याने त्यावर हवा आणि थंड वातावरणाचा थेट प्रभाव पडतो. यामुळे वारंवार ओठांना जीभ लावू नये.ओठांच्या त्वचेमध्ये तैलग्रंथी नसल्यामुळे त्वचा सुकून ओठांना चिरा पडतात. यामुळे ओठ फुटण्यापूर्वी व्हॅसलिन किंवा ‘लिप बाम’चा वापर नियमित करायला हवा, असेही डॉ. बरडे म्हणाले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन