शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना, डेंग्यूला घेऊन जा गे मारबत’ नागपूरकरांनी दिला मारबतीला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 21:02 IST

Nagpur News इतवारीतील नेहरू पुतळा चौकातील हे दृश्य बघण्यासाठी अख्खा इतवारी परिसर खचाखच भरलेला असतो; पण कोरोनामुळे सतत दुसऱ्या वर्षी पिवळ्या-काळ्या मारबतीची भेट होऊ शकली नाही.

ठळक मुद्देमारबतीचे यंदाही ‘फिजिकल डिस्टन्सिंग’

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : ऐतिहासिक मारबत उत्सवात पिवळी-काळी मारबत आलिंगन देतानाचा क्षण दरवर्षी लाखो नागपूरकर अनुभवतात. इतवारीतील नेहरू पुतळा चौकातील हे दृश्य बघण्यासाठी अख्खा इतवारी परिसर खचाखच भरलेला असतो; पण कोरोनामुळे सतत दुसऱ्या वर्षी पिवळ्या-काळ्या मारबतीची भेट होऊ शकली नाही. मारबतींनीही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांमुळे वस्तीतच मिरवणूक निघाली आणि नियोजित ठिकाणी त्यांचे दहन झाले. गर्दी मात्र तुफान होती.  (‘ take away Corona and dengue’ Marbat festival in Nagpur )

यंदा मारबत बडग्यांची भव्य मिरवणूक नसली तरी पिवळी व काळी मारबत विसर्जनासाठी निघताना लोकांची चांगलीच गर्दी दिसून आली. गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे त्रस्त झालेल्या आणि डेंग्यूच्या वाढत्या उद्रेकामुळे अस्वस्थ असलेल्या नागपूरकरांनी निरोप देताना कोरोना, डेंग्यूला घेऊन जागे मारबत अशी साद घातली. परंपरेनुसार पिवळ्या मारबतीची मिरवणूक तांडापेठ येथून निघाली. अवघ्या काही अंतरावरच असलेल्या पिवळी मारबत दहन भूमीत मारबतीचे दहन करण्यात आले. काळी मारबत नेहरू पुतळ्याजवळून मिरवणुकीसह निघाली. दोन्ही मारबतीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी इतवारी परिसरात मोठ्या संख्येने लोक एकत्र आले होते. तासाभरातच नियोजित दहनभूमीत काळ्या मारबतीचे दहन करण्यात आले. तऱ्हाने तेली समाजातर्फे साजऱ्या होणाऱ्या या मारबत उत्सवाचे यंदाचे हे १३७ वे वर्ष होते.

बिडीपेठेतही निघाली मिरवणूक

बिडीपेठ येथे सुद्धा मारबतीची मिरवणूक माथाडी कामगार सेनेचे शहर अध्यक्ष सिद्धू कोमजवार यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी झालेल्यांनी कोरोना, डेंग्यू, मलेरियाला घेऊन जा गे मारबत असे नारे लावले. या मारबत मिरवणुकीसाठी रवी विलायतकर, गजानन कोकुडे, साहील मडावी, राम पलेरीया, रजत कावळे, स्वप्निल मिसळकर, हर्ष मडावी, सोन्या मोते, राकेश कोटेवार, गौतम मेश्राम, आदींचे सहकार्य लाभले.

दिव्यांग संघटनांनी काढला महापालिकेचा बडग्या

दिव्यांगांच्या संघटनांनी पोळ्याच्या पाडव्यानिमित्त सक्करदरा परिसरातून महापालिकेचा बडग्या काढला. दिव्यांगांच्या मागण्यांच्या संदर्भात महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने महापालिकेचा निषेध म्हणून दिव्यांगांच्या संघटनेने महापालिकेच्या बडग्याची मिरवणूक काढली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम