शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पतीच्या मृत्यूस कारणीभूत आरोपींवर कारवाई करा

By admin | Updated: May 26, 2016 02:59 IST

मिरगीचा आजार नसताना वाडीच्या ‘एमआय क्लब’मध्ये ड्युटीवर गेलेला पती मिरगीचा झटका आल्याने अचानक पडून ...

पत्नीचा टाहो : वाडीच्या ‘एमआय क्लब’मधील मृत्यू प्रकरणनागपूर : मिरगीचा आजार नसताना वाडीच्या ‘एमआय क्लब’मध्ये ड्युटीवर गेलेला पती मिरगीचा झटका आल्याने अचानक पडून गंभीर जखमी झाल्याची बातमी राकेश ठाकूरची पत्नी पूर्णिमाला मिळाली. क्लबमध्ये गेल्यानंतर तेथील मालक आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात हलविण्यासाठी दोन तास कुठलीच मदत केली नाही. अखेर लता मंगेशकर रुग्णालय आणि तेथून मेडिकलमध्ये त्यांना हलविण्यात आले. मेडिकलमध्येही योग्य उपचाराअभावी पतीचा मृत्यू झाला असून पतीच्या मृत्यूस ‘एमआय क्लब’मधील मालक, कर्मचारी कारणीभूत असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची विनवणी राकेशची पत्नी पूर्णिमा ठाकूर करीत आहे.राकेश ठाकूर (२२) रा. सुदामनगरी हा वाडी येथील ‘एमआय क्लब’मध्ये तंदुरी रोटी बनविण्याचे काम करीत होता. नेहमीप्रमाणे तो २२ मे रोजी आपल्या ड्युटीवर गेला. परंतु रात्री ११ च्या सुमारास त्याला अचानक मिरगीचा झटका येऊन पडल्याने तो गंभीर जखमी झाल्याचा निरोप त्याची पत्नी पूर्णिमाला मिळाला. ती घाईगडबडीत क्लबमध्ये गेली असता राकेशला एका खोलीत बंद करून खोली बाहेरून बंद करून ठेवण्यात आली होती. राकेशजवळ जाताच त्याने डोळे उघडून पत्नीला पाहिले आणि तो बेशुद्ध झाला. विनवणी करूनही क्लबमधील कोणीच रुग्णालयात राकेशला नेण्यासाठी मदत केली नाही. अखेर १ वाजता क्लबच्या मालकाने एका ड्रायव्हरला सोबत दिले. राकेशला लता मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. तेथून मेडिकलमध्ये हलविण्यात आले. मेडिकलमध्येही फक्त सलाईन आणि आॅक्सिजन लावून कोणतेच उपचार करण्यात आले नसल्याने, दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचा आरोप राकेशची पत्नी पूर्णिमाने केला आहे. पतीच्या मृत्यूनंतर पूर्णिमाने त्याचे शवविच्छेदन करण्याची मागणी केली. परंतु क्लबमधील कर्मचाऱ्यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिल्यामुळे सुरुवातीला डॉक्टरांनी शवविच्छेदनास नकार दिला. त्याच्या मृत्यूची नोंदही मेडिकलच्या पोलीस चौकीत करण्यात आली नाही. अखेर रात्री १ वाजताच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. परंतु आता शवविच्छेदनाचा अहवाल मिळण्यासाठी दोन महिने लागणार असल्याचे पूर्णिमाला सांगण्यात येत आहे. पतीच्या मृत्यूस ‘एमआय क्लब’चे मालक आणि कर्मचारीच दोषी असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून आपणास न्याय देण्याची विनवणी पूर्णिमा ठाकूर करीत आहे. (प्रतिनिधी)