शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

तायवाडेंनी सामान्यांसाठी लढत असामान्यत्व मिळविले

By admin | Updated: February 15, 2016 02:59 IST

धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य व सच्चिदानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. बबनराव तायवाडे यांचे आयुष्य संघर्षरत राहिले.

षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा : मान्यवरांनी दिली कामाची पावतीनागपूर : धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य व सच्चिदानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असलेले डॉ. बबनराव तायवाडे यांचे आयुष्य संघर्षरत राहिले. सुरुवातीच्या काळात त्यांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल विकले, ट्युशन क्लासेस घेतले. कामाची लाज बाळगली नाही. परिश्रमातून यशाचा एक एक टप्पा गाठला. ते मित्र व माणसांशिवाय राहू शकत नाही. कुशल संघटक असलेले तायवाडे यांनी नेहमी सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी धडपड केली. त्यामुळेच त्यांना असामान्यत्व मिळाले, अशा शब्दात मान्यवरांनी डॉ. बबनराव तायवाडे यांचा गौरव करीत त्यांनी आजवर केलेल्या समाजकार्याची पावती दिली.डॉ. बबनराव तायवाडे यांचा षष्ट्यब्दीपूर्ती समारोह रविवारी धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्रांगणात पार पडला. अतिथी म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे होते. अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुण शेळके होते. मंचावर आयोजन समितीचे प्रमुख गिरीश गांधी, अनंतराव घारड, आ. सुनील केदार, आ. प्रकाश गजभिये, अतुल लोंढे, अनिल अहीरकर, महाराष्ट्र कॉमर्स टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष टी.ए. शिवारे, बलविंदर सिंग, माजी आ. दीनानाथ पडोळे, डॉ. प्रदीप घोरपडे आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. बबनराव तायवाडे व पत्नी डॉ. शरयू तायवाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, ६० किलो वजनांचा पुष्पहार, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रमेश बोरकुटे यांनी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाला मातोश्री लीलाताई तायवाडे यांच्यासह शैक्षणिक, सामाजिक, राजकीय यासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी खा. अशोक चव्हाण म्हणाले, डॉ. तायवाडे यांची षष्ट्यब्दीपूर्ती साजरी करण्यास आपण घाई केली. कारण, यामुळे आज लोकांना तायवाडे हे ६० वर्षांचे झाल्याचे कळले. आज आपण त्यांचा बायोडाटा बारकाईने वाचला. वाचून आश्चर्याचा धक्का बसला. एवढ्या पदव्या, एवढ्या संस्थांवर प्रतिनिधित्व करणाऱ्या एवढ्या ज्येष्ठ व्यक्तीला आपण आजवर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्याप्रमाणे कामे सांगत आलो, ही चूक केली असे वाटू लागले आहे. कार्यक्रमाला जमलेली गर्दी ही बबनरावांतील कुशल संघटकाने केलेल्या कामाची पावती आहे. पत्नी डॉ. शरयू यांनी त्यांना दिलेल्या साथीमुळे हे होऊ शकले, असेही ते म्हणाले. माणिकराव ठाकरे यांनी डॉ. तायवाडे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत काँग्रेसचा सच्चा शिपाई म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले. तायवाडे हे शिवाजी शिक्षण संस्थेत दडलेला हिरा आहेत. अहंकारीवृत्ती नसल्यामुळे तायवाडे यांच्याशी लोक जुळत गेले, अशा शब्दात अ‍ॅड. अरुण शेळके यांनी तायवाडे यांचा गौरव केला. गिरीश गांधी प्रास्ताविकातून म्हणाले, तायवाडे हे कुशल संघटकासोबतच करुणामय मन असलेले व्यक्ती आहेत. विधान परिषदेची निवडणूक तोंडावर असताना नितीन गडकरी यांचा अपघात झाला होता. त्या वेळी गडकरी आपल्या विरोधात प्रचाराला फिरू शकणार नाही, हे जाणून तायवाडे यांनी स्वत:हून माघार घेतली होती, अशी आठवण गांधी यांनी सांगितली. माजी प्र-कुलगुरू योगानंद काळे यांनी तायवाडे हे सकारात्मक विचार करणारी व्यक्ती असून, विद्यापीठाला समोर नेण्यासाठी त्यांनी सतत धडपड केल्याचे सांगितले. अतुल लोंढे, प्रदीप बोरवडे, अनिल अहीरकर यांनी तायवाडे यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देत ते सर्वांसाठी आधारवड ठरल्याचे सांगितले. आ. सुनील केदार व आ. प्रकाश गजभिये यांनीही तायवाडे व त्यांच्या पत्नी डॉ. शरयू यांच्या कार्याचा गौरव केला. संचालन डॉ. कोमल ठाकरे यांनी केले. या वेळी माजी मंत्री रमेश बंग, माजी आ. सुनील शिंदे, अशोक धवड, अविनाश वारजूरकर, सेवक वाघाये, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे, सुरेश भोयर, किशोर मोहोड, किरण पांडव, गिरीश पांडव आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर गझलसम्राट भीमराव पांचाळे यांच्या गझलांचा कार्यक्रम पार पडला.(प्रतिनिधी)