शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
7
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
8
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
9
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
10
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
11
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
12
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
13
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
14
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
15
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
16
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
17
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
20
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा

तडीपार गुंडावर तलवारीने हल्ला करून केले गंभीर जखमी; रामबागेत मध्यरात्री थरार

By दयानंद पाईकराव | Updated: April 13, 2024 18:53 IST

तिघांना अटक, दोनदा ‘सीपीं’नी भेट देऊनही गुन्हेगारी संपेना

नागपूर : मुलीची प्रकृती बरी नसल्यामुळे तिला पाहण्यासाठी आलेल्या तडीपार गुंडाच्या डोक्यावर तीन आरोपींनी तलवारीने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना ईमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी १३ एप्रिलला मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. रामबाग परिसरातील गुन्हेगारी आटोक्यात यावी यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी दोनवेळा या भागाला भेट देऊन नागरिकांचे समुपदेशन केल्यानंतरही या परिसरातील गुन्हेगारी सातत्याने डोकेवर काढत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

रितेश दीपक तायडे (२७, रा. कामगार भवनजवळ, रामबाग) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. तो मागील दोन वर्षांपासून तडीपार असून पुसद जि. यवतमाळ येथे राहतो. तर सन्नी सतिश गायकवाड (२४, रा. दहिकर झेंड्याजवळ, ईमामवाडा), साहिल राजेश ऊईके (२०) आणि तुषार नितीन नंदागवळी (२२) दोघे रा. दहिकर झेंड्याजवळ रामबाग अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रितेश तायडे याच्या मुलीची तब्येत खराब असल्यामुळे त्याच्या पत्नीने फोन करून रितेशला बोलावले. तो रात्री ११ वाजता पुसदवरून नागपुरात आला.

दरम्यान आरोपी साहिल व तुषार हे रितेशच्या घरासमोर मोठ्या आवाजात ओरडत होते. त्यामुळे रितेशने त्यांना घरासमोरून निघून जाण्यास सांगितले. त्यामुळे दोघेही ‘तु रुक तुझे देखते हे’ असे म्हणून तेथून निघून गेले. रात्री १ वाजता आरोपी साहिल व तुषार आरोपी सन्नीला घेऊन आले. सन्नीने रितेशला घराबाहेर काढून ‘तुने मेरे दोस्तो को यहा से क्यो भगाया, आज तुझे जिंदा नही छोडुंगा’ असे म्हणून हाताबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. तुषार आणि साहिलने रितेशला पकडून ठेवले व सन्नीने तलवारीने रितेशच्या डोक्यावर वार केला. रितेशच्या पत्नीने आरडाओरड केल्यामुळे वस्तीतील नागरिक मदतीसाठी धावले. दरम्यान आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. जखमी रितेशला उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणी इमामवाडाचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश पवार यांनी आरोपींविरुद्ध कलम ३०७, ३४ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली

इमामवाड्यातील गुन्हेगारी संपेनाइमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रामबाग, जाटतरोडीत गुन्हेगारांची संख्या अधिक आहे. या परिसरात नेहमीच चोरी, मारामारीच्या घटना घडतात. येथील गुन्हेगारी आटोक्यात यावी यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी आतापर्यंत दोन वेळा या वस्त्यांना भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला. परंतु त्याचा काहीच परिणाम झालेला दिसत नसून येथील गुन्हेगार अधुन-मधुन डोके वर काढताना दिसत आहेत.

रितेशची १८ एप्रिलला संपणार होती तडीपारीघटनेतील गंभीर जखमी झालेला रितेश तायडे हा मागील दोन वर्षांपासून तडीपार आहे. तो पुसद जि. यवतमाळ येथे राहत होता. १८ एप्रिल २०२४ रोजी त्याची तडीपारी संपणार होती. परंतु कुठलीही परवानगी न घेता तो शहरात आल्यामुळे ईमामवाडा पोलिसांनी त्याच्या विरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी