शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमी पुरोगामी चळवळीचे प्रतीक

By admin | Updated: August 29, 2015 03:16 IST

दीक्षाभूमी हे जागतिक कीर्तीचे स्मारक असून त्याचे आगळेवेगळे असे महत्त्व आहे. जगभरात मानवतेचा संदेश देणारे स्मारक म्हणून दीक्षाभूमी ओळखली जाते.

‘अ’ श्रेणीचा दर्जा मिळावा : ‘लोक’लढ्याला संघटनांचे बळ दीक्षाभूमी हे जागतिक कीर्तीचे स्मारक असून त्याचे आगळेवेगळे असे महत्त्व आहे. जगभरात मानवतेचा संदेश देणारे स्मारक म्हणून दीक्षाभूमी ओळखली जाते. असे असताना राज्य शासनाने दीक्षाभूमीला पर्यटन स्थळ म्हणून ‘ब’ श्रेणी घोषित केली आहे. त्यामुळे दीक्षाभूमीचे महत्त्व लक्षात घेता दीक्षाभूमीला ‘अ’ श्रेणीचा दर्जा प्राप्त व्हावा. यासाठी लोकमतने पुढाकार घेत दीक्षाभूमीच्या सन्मानासाठी या शिर्षकांतर्गत लढा सुरू केला आहे. त्याला आंबेडकरी संघटनांसह विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक संघटनांनी लोकमतच्या या उपक्रमाबद्दल लोकमतचे अभिनंदन केले आहे. ऊर्जा देणारी दीक्षाभूमी बहुजनांचेही प्रेरणास्थान १४ आॅक्टोबर १९५६ साली भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे ५ लाख अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली व सर्व दलित, पीडित, शोषित व वंचित असलेल्या घटकांना मुक्ती मिळवून संपूर्ण जगाला न्याय, समता, बंधूता व शांतीचा संदेश दिला. या पवित्र भूमीवर विशेष प्रसंगी आंबेडकरी अनुयायांची प्रचंड गर्दी असते. दररोज सुद्धा अनेक शाळा व महाविद्यालयांच्या सहलीनिमित्त विद्यार्थी दर्शन घेत असतात. ही गर्दी कोणत्याही अपेक्षेने येत नाही तर इथून ऊर्जा प्राप्त करून नव्या जोमाने समाजकार्य करीत असतात. ही पवित्र भूमी बहुजनांचे देखील प्रेरणास्थान आहे. या ठिकाणी आलेला अनुयायी नतमस्तक होऊन नवीन उद्दिष्ट साध्य करण्यास सज्ज होतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीक्षाभूमीला पर्यटनाचा अ दर्जा देऊन शासनाने स्वत:चा सन्मान वाढवावा. डॉ. सोहन चवरे- नरेंद्र धनविजय कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनानागपूर : दीक्षाभूमी ही पुरोगामी चळवळीचे प्रतीक असून बहुजनंचे प्रेरणास्थान आहे. त्यामुळे जगप्रसिद्ध असलेल्या दीक्षाभूमीला राज्य शासनाने ‘अ’ श्रेणीचाच दर्जा देणे गरजेचे आहे, अशी मागणी करीत यासाठी लोकमतने सुरू केलेल्या उपक्रमाचे अनेक संघटनांनी अभिनंदन केले आहे.