शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘सिम्बॉयसिस’चे प्रवेश जून २०१९ पासून; विद्या येरवडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 12:22 IST

आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातीप्राप्त ‘सिम्बॉयसिस’ विद्यापीठाच्या नागपूर शाखेचे प्रवेश जून २०१९ पासून सुरू होणार आहेत.

ठळक मुद्दे ‘ग्रीन कॅम्पस’वर भरपहिल्या टप्प्यात चार अभ्यासक्रमांची सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातीप्राप्त ‘सिम्बॉयसिस’ विद्यापीठाच्या नागपूर शाखेचे प्रवेश जून २०१९ पासून सुरू होणार आहेत. येथील इमारत ही आंतरराष्ट्रीय पातळीची असावी, असा आमचा प्रयत्न राहणार असून ‘ग्रीन कॅम्पस’वर आमचा भर राहणार असल्याची माहिती ‘सिम्बॉयसिस’ आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ.विद्या येरवडेकर यांनी दिली. ‘सिम्बॉयसिस’ आंतरराष्ट्रीय विद्यापीठ इमारतीच्या पायाभरणी समारंभाच्या अगोदर त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.‘सिम्बॉयसिस’ नागपुरात यावे ही आमची इच्छा होती व नितीन गडकरी, आ.कृष्णा खोपडे तसेच येथील प्रशासनाने पूर्ण सहकार्य केले. ७२ एकर जागेपैकी २६ एकरमध्ये पहिल्या टप्प्यात आम्ही बांधकाम करणार आहोत. सुरुवातीला आम्ही ‘बिझनेस मॅनेजमेन्ट’, विधी, ‘डिझाईन प्लॅनिंग’ आणि ‘आर्किटेक्चर’ हे अभ्यासक्रम सुरू करणार आहोत. सोबतच येथे कौशल्य विकास केंद्रदेखील स्थापन करण्यात येईल. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र इमारत असेल. नागपुरातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशामध्ये २५ टक्के आरक्षण असेल तर येथील विद्यार्थ्यांना शुल्कामध्ये १५ टक्क्यांची सूट देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.येथील ‘कॅम्पस’ हा ‘इको-फ्रेंडली’ असावा असा आमचा मानस आहे व ‘ग्रीन कॅम्पस’ करण्याच्या दृष्टीने आम्ही पावले उचलत आहोत. नागपूरच्या ‘सिम्बॉयसिस’ आंतरराष्ट्रीय विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, क्रीडा संकुल, ‘कन्व्हेन्शन सेंटर’, केंद्रीय वाचनालय यांचीदेखील उभारणी करण्यात येणार आहे, असेदेखील डॉ.येरवडेकर यांनी सांगितले.

राज्य शासन करणार सहकार्य : बावनकुळे‘सिम्बॉयसिस’ आंतरराष्ट्रीय विद्यापीठात ‘ग्रीन कॅम्पस’ तयार करण्यात राज्य शासनदेखील सहकार्य करेल, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. येथे विजेसाठी सौर प्रणाली वापरण्याचा प्रस्ताव विद्यापीठाने शासनाला सादर करावा. २५ टक्के अनुदान शासनातर्फे देण्यात येईल. सौरऊर्जेमुळे विद्यापीठाला विजेच्या बिलांसाठी एकही पैसा खर्च करावा लागणार नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :symbiosisसिंबायोसिस