शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

स्वाईन फ्लू दारात,मनपा कोमात !

By admin | Updated: February 20, 2015 02:17 IST

स्वाईन फ्लू मुळे राज्यात आजवर ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ३१ रुग्णांचा मृत्यू नागपुरात झाला आहे. स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उपराजधानी हादरली आहे.

नागपूर : स्वाईन फ्लू मुळे राज्यात आजवर ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील ३१ रुग्णांचा मृत्यू नागपुरात झाला आहे. स्वाईन फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उपराजधानी हादरली आहे. स्वाईन फ्लूने शहरात थैमान घातले असताना महापालिकेची आरोग्य यंत्रणा उपाय योजण्याऐवजी कोमात गेल्याचे चित्र आहे. स्वाईन फ्लूवर उपाय योजण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयात कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. महापालिकेच्या रुग्णालयात आलेल्या रुग्णाला मेयो-मेडिकलमध्ये रेफर करणे, आकडेवारी गोळा करून पाठविणे, फार फार तर माहिती पत्रके वाटणे एवढे काम करून महापालिका आपली जबाबदारी झटकत असल्याचे चित्र आहे. नागरिकांचे हाल : मेयो, मेडिकलवर भार मनपाच्या आरोग्य विभागाचे तीन मोठे रुग्णालय व आवश्यक मनुष्यबळ असतानाही स्वाईन फ्लूच्या रुग्णांना भरती केले जात नाही. रुग्ण तपासणीची वेळही मर्यादित आहे. संशयित रुग्ण आढळून आल्यास थेट मेडिकलला रेफर आणि पॉझिटीव्ह रुग्णांच्या घरी जाऊन औषधांचे वितरण या पलिकडे विभागाला काम नाही. विशेष म्हणजे, संशयित रुग्णाचे नमुने घेण्याचे औचित्यही हा विभाग दाखवित नसल्याने आरोग्य विभागाची शहरातील नागरिकांच्या आरोग्याबाबतची अनास्था स्पष्टपणे दिसून येत आहे. तपासणी केंद्र शोभेसाठी स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपाने दहा तपासणी केंद्र सुरू केले. हे केंद्र इंदिरा गांधी रुग्णालय, आयसोलेशन रुग्णालय, डीक दवाखाना, शांतिनगर, बगडगंज, इतवारी, पाचपावली, बेझनबाग, सदर आणि महाल येथे आहेत. प्रत्येक केंद्रात एमबीबीएस डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची सोय आहे. केंद्राची वेळ सकाळी ८ ते दुपारी २ वाजताची आहे, परंतु दुपारी १ वाजता नंतर रुग्ण गेल्यास त्याला उपचाराविना परतावे लागते. विशेष म्हणजे, स्वाईन फ्लू संशयित रुग्ण आढळून आल्यास त्याच्या संदर्भातील एक अर्ज भरून थेट मेडिकलकडे रेफर केले जाते. यामुळे हे तपासणी केंद्र शोभेचे बाहुले ठरत आहे.