शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ठगबाज गुरनुलेने  खड्ड्यात लपवून ठेवले होते ५५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 21:08 IST

Swindler Gurnule had hidden Rs 55 lakh in the pit, crime news देशभरातील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हडपणाऱ्या ठगबाज विजय रामदास गुरनुले याने त्याच्या अमरावतीतील नातेवाईकाकडे रोकड लपवून ठेवली होती. विशेष म्हणजे, ही रोकड त्याने घरात खड्डा करून त्यात पुरून ठेवली होती.

ठळक मुद्देअमरावतीतील नातेवाईकाकडे छापा : पोलिसांकडून रोकड जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशभरातील हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हडपणाऱ्या ठगबाज विजय रामदास गुरनुले याने त्याच्या अमरावतीतील नातेवाईकाकडे रोकड लपवून ठेवली होती. विशेष म्हणजे, ही रोकड त्याने घरात खड्डा करून त्यात पुरून ठेवली होती. पोलिसांनी अमरावतीला छापा मारून ही ५५ लाखांची रक्कम जप्त केली, अशी माहिती पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांनी मंगळवारी दुपारी पत्रकारांना दिली.

महाठग विजय गुरनुले आणि त्याच्या टोळीतील साथीदारांचे फसवणुकीचे नवनवे किस्से पुढे येत आहेत. त्यासंबंधीची माहिती उपायुक्त हसन यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याचे कळताच महाठग गुरनुले फरार झाला. त्याने बनवाबनवी करून जमविलेली रोकडही इकडे तिकडे लपवून ठेवण्यासाठी धावपळ केली. मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या. सध्या तो पीसीआरमध्ये आहे. चौकशीत त्याने अमरावतीच्या एका नातेवाईकाकडे रोकड लपवून ठेवली, अशी माहिती दिली. त्यानुसार विशेष तपास पथक सोमवारी गुरनुलेच्या अमरावतीतील नातेवाईकाच्या घरी धडकले. त्यांनी संपूर्ण घरात शोधाशोध केली. मात्र रोकड मिळाली नाही. त्यामुळे पोलिसांनी गुरनुलेला खाक्‍या दाखविला. त्यानंतर त्याने नातेवाईकाच्या घरात खड्डा खोदून त्यात रक्कम लपवून ठेवल्याचे सांगितले. त्याने ती जागाही दाखवली. त्यानुसार पोलिसांनी खड्ड्यातून ५५ लाखांची रोकड बाहेर काढून ती जप्त केली.

टॅग्स :fraudधोकेबाजीArrestअटक