शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जलतरणपटू कांचनमाला पांडेला विशेष बाब म्हणून १५ लाखांचे पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 00:24 IST

मेक्सिको येथे झालेल्या वर्ल्ड पॅरास्विमिंग चॅम्पियनशिप २०१७ या स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नागपूरच्या कांचनमाला पांडेला विशेष बाब म्हणून १५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र् फडणवीस यांनी गुरुवारी मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावास मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मेक्सिको येथे झालेल्या वर्ल्ड पॅरास्विमिंग चॅम्पियनशिप २०१७ या स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नागपूरच्या कांचनमाला पांडेला विशेष बाब म्हणून १५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र्र्र फडणवीस यांनी गुरुवारी मंजुरी दिली आहे.दिव्यांग जलतरणपटूंचा सहभाग असलेल्या या जागतिक स्पर्धेमध्ये कांचनमाला भारताकडून पात्र ठरलेली एकमेव महिला जलतरणपटू होती. या स्पर्धेमध्ये एस-११ या श्रेणीत २०० मीटर वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घालणारी कांचनमाला भारताची पहिली जलतरणपटू ठरली. तिच्या सत्काराप्रसंगी १५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती.आॅलिम्पिक, राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत पदक मिळवणारे खेळाडू तसेच त्यांचे मार्गदर्शक यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्याची योजना २०१४ मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेतील तरतुदींनुसार पॅराआॅलिम्पिक तसेच पॅराएशियन स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करणाºया खेळाडूंना अनुक्रमे ३० लाख रुपये व ३ लाख रुपये इतके रोख बक्षीस देण्याची तरतूद आहे. मात्र, वर्ल्ड पॅरास्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेचा योजनेमध्ये समावेश नव्हता. तथापि, कांचनमालाचे कौतुकास्पद यश लक्षात घेता, एक विशेष बाब म्हणून या योजनेतून रोख पारितोषिक देऊन गौरव करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास दिले होते. त्यानुसार याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्यात येऊन त्यास मुख्यमंत्र्यांनी आज मंजुरी दिली आहे.

टॅग्स :Sportsक्रीडाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस