शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्निल व श्रेयसची लोकमतला सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 11:07 IST

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीने दमदार कथानकाची अनुभूती चोखंदळ रसिकांना करून दिली आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजही आता मराठीकडे वळले आहे, असे मत अभिनेते स्वप्निल जोशी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमराठी चित्रपटांचे कथानक दर्जेदार

मंगेश व्यवहारे/अंकिता देशकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठी रसिक हे चोखंदळ आहेत. त्यामुळे मराठी चित्रपट केवळ अभिनेते अथवा अभिनेत्रीवर चालत नाही. मराठी रसिकांना आनंद देण्यासाठी दमदार कथानकाची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटसृष्टीने दमदार कथानकाची अनुभूती चोखंदळ रसिकांना करून दिली आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गजही आता मराठीकडे वळले आहे, असे मत अभिनेते स्वप्निल जोशी यांनी व्यक्त केले.दिग्दर्शक श्रेयस जाधव यांच्या ‘मी पण सचिन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते नागपुरात आले असता त्यांनी लोकमतला सदिच्छा भेट दिली. खेळ या क्षेत्रावर मराठीत ‘मी पण सचिन’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट सचिन तेंडुलकर यांच्या चाहत्यावर आधारित आहे. त्या चाहत्याचे स्वप्न लॉर्डस्च्या मैदानावर खेळण्याचे आहे. या फॅन्सचा प्रवास आणि त्यात आलेले संघर्ष आणि आनंदाचे क्षण यावर तो चित्रपट चित्रित केला आहे. खेळावर मराठीतील हा पहिलाच चित्रपट असल्याचे स्वप्निल म्हणाले. चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या स्वप्निलने चित्रपटासाठी विशेष मेहनत घेतली आहे. त्यासाठी त्याने १३ किलो वजन कमी केले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटाची तुलना कशी कराल, याविषयी स्वप्निल म्हणाले की, केवळ चित्रपटाचे बजेट सोडल्यास काहीच फरक नसतो. मराठी चित्रपट हा कमी बजेटमध्ये बनत असल्याने सोबतच चांगले कथानक पुढे येत असल्याने हिंदी चित्रपटातील दिग्दर्शक, अभिनेते आता मराठी चित्रपटात रस घेऊ लागले आहेत.‘मी पण सचिन’ या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक असलेले श्रेयस जाधव हे मूळचे नागपूरचे आहेत. त्यांनी व्यावसायिक क्रिकेट खेळले आहे. सध्या ते चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. क्रिकेटची आवड असल्यामुळे त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. पहिलाच चित्रपट असतानाही स्वप्निलसारख्या दर्जेदार कलावंतांनी त्यात मुख्य भूमिका साकारल्याचा आनंद श्रेयसने व्यक्त केला. पुण्यातील भोर येथे चित्रपटाचे शुटींग झाले आहे. २० मिनिटांची क्रिकेट मॅच यात दाखविली आहे.१ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे डायलॉग अजिता काळे यांनी लिहिले आहे. चित्रपटात स्वप्निल जोशी यांच्यासोबत अभिजित खांडेकर, प्रियदर्शन जाधव, कल्याणी मुळे, अविनाश नारकर, अनुजा साठे आणि सुहिता थेट्टे आहे.

टॅग्स :Swapnil Joshiस्वप्निल जोशी