शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात संशयखोर पतीने केली पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 21:10 IST

संशयाने पछाडलेल्या आरोपीने त्याच्या पत्नीची गळा कापून हत्या केली. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिवरी नगरात मंगळवारी पहाटे ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्दे धारदार शस्त्राने कापला गळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संशयाने पछाडलेल्या आरोपीने त्याच्या पत्नीची गळा कापून हत्या केली. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिवरी नगरात मंगळवारी पहाटे ही थरारक घटना घडली. विलास मनोहर भुजाडे (वय ३८) असे आरोपीचे नाव असून श्रुती विलास भुजाडे (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे.आरोपी विलास भुजाडे आणि श्रुतीचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना साडेचार वर्षांची माही नामक मुलगी आहे. काही दिवसांपासून विलासला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला होता. संधी मिळताच श्रुती मोबाईलवर तासन्तास कुणाशी तरी गप्पा मारत होती. त्यामुळे तिचे बाहेर अवैध संबंध असावेत, असे विलासला वाटत होते. त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडण होत होते.सोमवारी तो कामाच्या निमित्ताने बाहेर गेला होता. त्यानंतर श्रुतीसुद्धा घराबाहेर गेल्याचे त्याला कळले. रात्री घरी परत आल्यानंतर या दोघांमध्ये त्यावरून वाद सुरू झाला. वारंवार सांगूनही तू ऐकत का नाही, कुणाशी बोलते, आज तू बाहेर कुणाकडे गेली होती, असे प्रश्न करून विलासने श्रुतीला धारेवर धरले. डॉक्टरकडे गेली होती, असे सांगून तिने वाद संपवण्याचा प्रयत्न केला; मात्र संशयाचे भूत मानगुटीवर बसल्यामुळे विलास मानायला तयार नव्हता. त्यामुळे मध्यरात्र झाली तरी त्यांच्यातील वाद सुरूच होता. पहाटे ३.३० च्या सुमारास अचानक श्रुतीची किंकाळी ऐकू आली आणि खालच्या तसेच वरच्या माळ्यावर राहणारे त्याचे भाऊ, वहिनी आणि आई-वडील धावले. श्रुतीच्या गळ्यावर विलासने धारदार शस्त्राने घाव घातले होते. ती रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. हे थरारक दृश्य पाहून नातेवाईकांनी नंदनवन पोलिसांना माहिती दिली. नंदनवन पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी विलासला ताब्यात घेतले.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर