शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या दुकानदाराचा संशयास्पद मृत्यू

By admin | Updated: October 22, 2014 00:57 IST

शहरात सायकल दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीचा यवतमाळ जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाला. या व्यक्तीच्या हत्येचा आरोप असलेल्या पती, पत्नी व मुलाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर

हायकोर्ट : यवतमाळ जिल्ह्यातील घटना, तिघे निर्दोषनागपूर : शहरात सायकल दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीचा यवतमाळ जिल्ह्यात संशयास्पद मृत्यू झाला. या व्यक्तीच्या हत्येचा आरोप असलेल्या पती, पत्नी व मुलाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष ठरविले आहे.नरेश महादेव भगत (५५), नंदा नरेश भगत (४५) व विशाल नरेश भगत (२३) अशी आरोपींची नावे असून ते आमसेट, ता. दारव्हा येथील रहिवासी आहेत. मृताचे नाव मनोहर होते. आरोपी नरेश नागपुरात सायकल रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. तो मनोहरच्या दुकानात सायकल रिक्षा दुरुस्त करण्यासाठी जात होता. यामुळे दोघांची घट्ट मैत्री झाली होती. मनोहर नरेशच्या घरी जात होता. दरम्यान, मनोहर व नंदाचे अनैतिक संबंध निर्माण झाले. परिणामी नरेश पत्नी व मुलासह गावात परतून वडिलोपार्जित शेती वाहायला लागला. यानंतरही मनोहरचे नंदासोबतचे संबंध कायम होते. तो आमसेटमध्ये येऊन नंदाला भेटत होता. तिच्या घरी मुक्काम करीत होता. नरेशने मनोहरला अनेकदा समजावले, पण तो मानला नाही. यामुळे मनोहरची हत्या करण्यात आली, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. १८ जुलै २००९ रोजी मनोहर आरोपीच्या घरी गेला होता. त्याच दिवशी मध्यरात्रीनंतर त्याचा मृतदेह आढळून आला. मनोहरची पत्नी निर्मलाने १३ आॅगस्ट रोजी लाडखेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून आरोपींवर हत्येचा संशय व्यक्त केला होता. दारव्हा सत्र न्यायालयाने २७ एप्रिल २०१२ रोजी तिन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत आजन्म कारावास व ३००० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करून आरोपींना निर्दोष सोडण्याचे निर्देश दिलेत. मनोहरची विजेचा शॉक देऊन हत्या झाल्याचा दावा सरकारी पक्षाने केला होता. परंतु, रासायनिक अहवालात ही बाब स्पष्ट झाली नाही. तसेच, मनोहरला आरोपींनी विजेचा धक्का दिल्याचे सरकारी पक्षाला सिद्ध करता आले नाही. निर्मलाने सुमारे एक महिना विलंबाने तक्रार नोंदविली. या विलंबाचे कारणही स्पष्ट करण्यात आले नाही. उच्च न्यायालयाने निर्णय देताना यासह विविध बाबी लक्षात घेतल्या.(प्रतिनिधी)