शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

नागपूरच्या युवकाचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांना हत्येची शंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 21:34 IST

संशयास्पद मृत अवस्थेत सापडलेल्या पंकज अंभोरे नावाच्या युवकाची हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे. पंकजच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पाचपावली पोलिसांनी या दिशेने तपास सुरू केला आहे. ते पंकजच्या पत्नीची विचारपूस करीत आहेत.

ठळक मुद्देपोलिसांनीही सुरू केला तपास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संशयास्पद मृत अवस्थेत सापडलेल्या पंकज अंभोरे नावाच्या युवकाची हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे. पंकजच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पाचपावली पोलिसांनी या दिशेने तपास सुरू केला आहे. ते पंकजच्या पत्नीची विचारपूस करीत आहेत.हसनबाग रोडवरील ३४ वर्षीय पंकज चंद्रकांत अंभोरे ५ डिसेंबर रोजी रात्री कामठी रोडवर संशयास्पद पद्धतीने जखमी अवस्थेत सापडला होता. यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होता. मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. अंभोरे हा कामठी रोडवरील शिल्पा स्टीलमध्ये काम करीत होता. तेथून परत येत असतानाच संशयास्पद अवस्थेत जखमी झाला होता. याबाबत सर्वप्रथम पत्नी मनीषाला माहिती मिळाली. पोलिसांच्या विचारपूसदरम्यान तिने सांगितले की, पंकज फाईव्ह व्हिलरने येत होता. तिचे म्हणणे होते की, ती मागून येत होती. रस्त्यात पंकज जखमी अवस्थेत सापडल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. पंकज बाईकवर ड्युटीला जात होता. अशा परिस्थितीत तो फाईव्ह व्हिलरने घरी परत येत असल्याचे कारण पोलिसांना पटलेले नाही.याबाबत विचारपूस केली असता मनीषा समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. त्यानंतर पंकजच्या नातेवाईकांचाही संशय बळावला आहे.पंकजच्या नातेवाईकांना त्याची हत्या केल्याचा संशय आहे. पंकजच्या कुटुंबात आई-वडील आणि भाऊ सागर आहे. सागर हैद्राबादला रहतो. आई-वडील वेगळे राहतात. पंकज पत्नी व सात वर्षाच्या मुलीसोबत राहत होता. त्याच्या नातेवाईकानुसार मनीषाच्या पहिल्या पतीचा मृत्यू झाला आहे. यानंतर तिने गुजरातच्या एका युवकाशी लग्न केले. काही वर्षानंतर त्याला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर ती नागपूरला आली. यानंतर ती पंकजच्या संपर्कात आली. पंकज तिच्यासोबत राहू लागला. मनीषाला पंकजच्या आई-वडिलांसोबत राहणे पसंत नव्हते. त्यामुळे सेवानिवृत्त अंभोरे दाम्पत्य वेगळे राहू लागले होते. काही दिवसांपासून पंकजचे दाम्पत्य जीवन व्यवस्थित नाही. तो मनीषाच्या वागण्याबाबत विरोध करीत होता. यावरून दोघांमधील वाद वाढला होता.सूत्रानुसार या प्रकरणात सीताबर्डीतील एका डिपार्टमेंटल स्टोरमध्ये काम करणाऱ्या युवकाचीही भूमिका आहे. हा युवक पंकजला खटकत होता. पंकज त्याच्याशी चर्चा करण्यासाठी आपल्या एका मित्रासोबत अमरावती रोडवरील एका ढाब्यावर गेला होता. तिथे दोघांमध्ये खूप वेळ चर्चा झाली. पंकजने त्याला आपल्या जीवनपासून दूर राहण्याची समज दिली होती. तरीही त्याने ऐकले नाही. त्यामुळे या प्रकरणात त्या युवकाचीही भूमिका असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.महिनाभरापूर्वीच वाचला जीवमिळालेल्या माहितीनुसार एक महिन्यापूर्वी पंकजसोबत एक घटना घडली होती. विषप्राशन केल्याने त्याची प्रकृती बिघडली होती. त्याला सदर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवस उपचारानंतर त्याचा जीव वाचला. या घटनेबाबत कुणालाही माहीत नाही. पंकजच्या मृत्यूनंतर ही गोष्ट समोर आली. त्यावेळीही पंकज एखाद्या कटाअंतर्गत बळी पडला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. ताज्या प्रकरणाबाबतही मनिषा वारंवार बदलत आहे. सुरुवातीला तिने अपघात झाल्याचे सांगितले होते. पोलिसांनी कसून विचारपूस केली असता पंकजने स्वत:च दगडाने डोक्यावर मारून घेतल्याचे सांगत आहे.२५ लाखाचा विमाअसे सांगितले जाते की, पंकजने २५ लाखाचा अपघात विमा काढला होता. या विम्याच्या रकमेसाठी सुरुवातीला अपघाताचे कारण सांगितले जात होते. परंतु नातेवाईकांना विश्वास नसल्याने ते कारण अधिक वेळ टिकू शकले नाही.चिमुकलीला प्रचंड मानसिक धक्काया प्रकरणाने पंकजच्या सात वर्षीय मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. वडिलांची हत्या आणि आईच्या वर्तनाबाबत प्रश्न विचारले जात असल्याने ती घाबरलेली आहे. आईवडिलांमध्ये होणारे वादही तिला माहीत आहे. ती वडिलांची अतिशय लाडकी होती. तिनेच वडिलांना अनेक गोष्टींची माहिती सांगितली होती. पंकजच्या अंत्यसंस्कारानंतर पाचपावली पोलीस बुधवारी दुपारी मनिषाला घटनास्थळ आणि इतर गोष्टींची माहिती पुष्टी करण्यासाठी घेऊन गेले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून