लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पारशिवनी तालुक्यातील नयाकुंड शिवारात बुधवारी दुपारच्या सुमारास एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला. शेतकरी ज्ञानेश्वर बारसाखरे यांच्या शेतात काम करीत असलेल्या मजुरांना ही बाब लक्षात आली. या बिबट्याचामृत्यू विषयप्रयोग अथवा विद्युत प्रवाहाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.स्थानिकांनी या घटनेची माहिती रामटेक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली. सायंकाळच्या सुमारास वनविभागाची चमू घटनास्थळी आली. त्यांनी मृत बिबट्याचा पंचनामा केला.सदर बिबट्याचा मृत्यू हा विषप्रयोग अथवा विद्युत प्रवाहाने झाला असल्याची शक्यता आहे. बिबट्याचे सर्व अवयव शाबूत असल्याचे घटनास्थळी दाखल झालेल्या वनकर्मचाऱ्याने संगितले. मात्र वनविभागाच्या चमूने कुणालाही घटनास्थळी येऊ दिले नाही. मृत बिबट्या अंदाजे ३ वर्षाचा असल्याचे सांगितले जात आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघ आणि बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे. याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाकडे तक्रारी केल्या आहेत.
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 11:36 IST
Leopard, Nagpur News पारशिवनी तालुक्यातील नयाकुंड शिवारात बुधवारी दुपारच्या सुमारास एका बिबट्याचा मृतदेह आढळून आला.
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू
ठळक मुद्देनयाकुंड शिवारातील घटना