शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

टंकलेखन परीक्षेत बाेगसगिरीचा संशय, शहरापासून २५ किमी दूर परीक्षा केंद्र कसे?

By निशांत वानखेडे | Updated: June 11, 2024 18:18 IST

संघर्ष समितीचा आराेप : सुविधा नसल्याने पाेहचण्यास शेकडाे विद्यार्थ्यांना मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : संगणक टंकलेखन (टायपिंग) परीक्षेसाठी आवश्यक सुविधा असलेले अनेक केंद्र नागपूर शहरात असताना येथील विद्यार्थ्यांना शहरापासून २५ किलाेमीटर दूरचे केंद्र देण्यावर आक्षेप घेतला जात आहे. केंद्रावर पाेहचण्यास सुविधा नसल्याने शेकडाे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. केवळ गैरप्रकार करण्यासाठी असे केंद्र देण्यात आल्याचा आराेप महाराष्ट्र राज्य संगणक टायपिंग संघर्ष समितीने केला आहे.

राज्यात विविध अस्थापनांच्या क्लरिकल पदांसाठी टंकलेखन पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात सध्या दाेन सत्रात संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येत आहे. इंग्रजी टायपिंगसाठी १० ते १४ जून या कालावधीत आणि मराठी, हिंदी टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा १८ ते २० जून या कालावधीत घेण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातून ८ ते १० हजार विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. त्यासाठी तालुकास्तरावर प्रत्येकी एक केंद्र आहेत. नागपूर शहरात आदर्श हायस्कूल, श्रीकृष्णनगर आणि विदर्भ बुनियादी हायस्कूल, सक्करदरा असे दाेन केंद्र आहेत. मात्र शहरातील शेकडाे विद्यार्थ्यांना २५ किमी दूर आठवामैल, दृगधामना येथील श्री साई ताज पाॅलिटेक्निक काॅलेजचे सेंटर देण्यात आले आहे. टायपिंग इन्स्टिट्यूटच्या जवळच परीक्षा केंद्र असताना असे डाेंगराळ अनिवासी परिसरात परीक्षा केंद्र का दिले, असा प्रश्न संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश हरणे यांनी उपस्थित केला.

हरणे यांनी सांगितले, श्री साई पॉलीटेक्निक कॉलेज परिसरात नागरी वसाहत नाही, अतिशय खराब रस्ता, तसेंच एसटी बस/शहर स्टार बस पोहचत नाही. अशा डोंगराळ परिसरात परीक्षा केंद्र निवड करण्याचा हेतू काय, असा सवाल त्यांनी केला. परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागताे. या केंद्रावर भरारी पथकही वेळेवर पाेहचू शकत नाही. त्यामुळे केवळ गैरप्रकार करण्यासाठी शहरातील काही संस्था चालकांनी याची मागणी करून, हे परीक्षा केंद्र निवडल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार खरबी येथील संस्थेचे ३० विद्यार्थी परीक्षेसाठी सुनसान रस्त्याने या केंद्रावर कसेबसे पाेहचले. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनीही राेष व्यक्त केला.

परीक्षा परिषद अध्यक्षांच्या पत्रात इशारापरीक्षा केंद्रावर डमी विद्यार्थी बसविणे, टंकलेखनात निपूण उमेदवारांकडून इतर उमेदवारांची उत्तरपत्रिका टंकलिखित करणे, जाणीवपूर्वक संगणक बंद करून वेळ वाया घालविणे व नंतर इतरांकडून उत्तरपत्रिका साेडवून घेणे, परीक्षार्थी अदलाबदल करणे, असा प्रकार चालताे. त्यामुळे उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी परीक्षा केंद्रावर आकस्मिक भेटी देण्याचे निर्देश परीक्षा परिषद अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या निर्देशांचे पालन हाेते का, हा प्रश्न आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रfraudधोकेबाजीnagpurनागपूर