शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरीतील वाघिणीला बेशुद्ध करण्यावर स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 20:47 IST

स्वत:च्या चार बछड्यांसह ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून बाहेर निघून रहिवासी क्षेत्रात फिरत असलेल्या वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याच्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी स्थगिती दिली. तसेच, वन विभागाला नोटीस बजावून यावर २८ मार्चपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देहायकोर्ट : वन विभागाला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वत:च्या चार बछड्यांसह ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून बाहेर निघून रहिवासी क्षेत्रात फिरत असलेल्या वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याच्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी स्थगिती दिली. तसेच, वन विभागाला नोटीस बजावून यावर २८ मार्चपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.या आदेशाविरुद्ध स्वानंद सोनी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी २० मार्च रोजी हा आदेश जारी केला होता. वाघिणीचे बछडे तीन महिन्यांचे असून ती सध्या जंगलाच्या बाहेर फिरत आहे. काही शेतकऱ्यांना ती शेतात बसलेली दिसून आली. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहेत. त्या वाघिणीचा माणसांशी संघर्ष होऊ नये यासाठी हा आदेश जारी करण्यात आला होता. वाघिणीला बेशुद्ध करून पकडून जंगलात सोडण्याचा वन विभागाचा उद्देश होता. याचिकाकर्त्याने हा आदेश अवैध असल्याचे याचिकेत म्हटले आहे. हा आदेश कायद्यानुसार नाही. वाघिणीला चार बछडे आहेत. बेशुद्ध करण्याच्या प्रक्रियेदरम्यान ते एकमेकांपासून दुरावू शकतात. बछड्यांचे प्राण धोक्यात येऊ शकतात. वाघीण जंगलात जाण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे तिला बेशुद्ध करून पकडण्याची गरज नाही असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अक्षय नाईक व अ‍ॅड. राहुल कलंगीवाले यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयforest departmentवनविभाग