शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ एक्सप्रेसच्या जनरल कोचचे सस्पेंशन स्प्रिंग तुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 00:41 IST

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे विदर्भ एक्सप्रेस मोठ्या दुर्घटनेपासून बचावली. गोंदियाहून मुंबईला जात असताना ट्रेन प्लेटफार्मवर लागत होती. यावेळी रेल्वेच्या चाकांची पाहणी करणाऱ्या २ रेल्वे कर्मचाऱ्यांना इंजिनला लागून असलेल्या जनरल कोचचा एक सस्पेंशन स्प्रिंग तुटल्याचे दिसले. ही माहिती मिळताच मेकॅनिकल विभाग लगच कामाला लागला. अवघ्या ३० मिनिटात बोगीचा स्प्रिंग बदलविण्यात आला. त्यानंतर विदर्भ एक्सप्रेस रवाना झाली.

ठळक मुद्देरेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने टळला अपघात

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे विदर्भ एक्सप्रेस मोठ्या दुर्घटनेपासून बचावली. गोंदियाहून मुंबईला जात असताना ट्रेन प्लेटफार्मवर लागत होती. यावेळी रेल्वेच्या चाकांची पाहणी करणाऱ्या २ रेल्वे कर्मचाऱ्यांना इंजिनला लागून असलेल्या जनरल कोचचा एक सस्पेंशन स्प्रिंग तुटल्याचे दिसले. ही माहिती मिळताच मेकॅनिकल विभाग लगच कामाला लागला. अवघ्या ३० मिनिटात बोगीचा स्प्रिंग बदलविण्यात आला. त्यानंतर विदर्भ एक्सप्रेस रवाना झाली.मिळालेल्या माहितीनुसार विदर्भ एक्सप्रेस आपल्या वेळेनुसार ५ वाजून १० मिनिटांनी नागपूर रेल्वेस्थानकावर पोहचली. प्लॅटफॉर्म ३ वर लागण्यापूर्वी ट्रेनचे चाकांची तपासणी करणारे एसएसई धर्मराज कुमार व टेक्निशियन विनोद चिटमिटवार यांची नजर जनरल कोचचा सस्पेंशन स्प्रिंगवर पडली. तांंत्रिक भाषेत याला बोल्स्टर स्प्रिंग म्हणतात. धर्मराज व विनोद यांनी तत्काळ याची माहिती सीनियर डीएमई अभिषेककुमार चौबे यांना दिली. पुढे कुठलीही दुर्घटना होवू नये म्हणून त्यांनी नागपूर रेल्वेस्थानकावर स्प्रिंग बदलण्याचा निर्णय घेतला. विदर्भ एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर थांबल्यानंतर त्या कोच ला ट्रेनपासून वेगळे करुन प्लॅटफॉर्म ४ वर लावण्यात आले. चौबे यांच्या मार्गदर्शनात ५० हुन अधिक कर्मचारी कामावर जुटले. ३० मिनिटात तुटलेला स्प्रिंग काढून दुसरा स्प्रिंग फिट करण्यात आला. ३० मिनिटात स्प्रिंग बदलविल्यानंतर पुन्हा कोचला ट्रेनशी जोडण्याच्या प्रक्रियेला दीड तासांचा वेळ लागला. त्यामुळे विदर्भ एक्सप्रेस नागपूर रेल्वेस्थानकावरून ६ वाजून ५० मिनिटांनी रवाना झाली. जनरल कोच हा नवीनच होतारेल्वे धावत असताना जम्पिंग होवून रुळाच्या खाली येवू नये म्हणून बोस्टर स्प्रिंग महत्वाचा असतो. विदर्भ एक्सप्रेसमध्ये ज्या कोचचे स्प्रिंग तुटलेले होते. त्या कोचला बनून वर्षही पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे बोस्टर स्प्रिंगच्या तुटल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. हे कोच आधुनिक सुविधेने सज्ज आहे. यात पिण्याच्या पाण्याचा ‘आरओ’, टॉयलेट इंडिकेटर लावले आहे. सोयीसुविधा वाढविण्यासाठी गुणवत्तेवर परिणाम होत आहे. रेल्वेच्या निर्माणीत गुणवत्तेवर होणारा परिणाम भविष्यात त्रासदायक ठरू शकतो.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरVidarbhaविदर्भ