शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

होमगार्डचे सूडबुद्धीने निलंबन !

By admin | Updated: July 10, 2015 02:37 IST

पोलीस भरतीसाठी अनुभव प्रमाणपत्र न देता उलट सूडबुद्धीने निलंबन कारवाई केल्याच्या आरोपासह एका होमगार्ड ...

जिल्हा समादेशकाचा प्रताप : पोलीस आयुक्तांकडे तक्रार नागपूर : पोलीस भरतीसाठी अनुभव प्रमाणपत्र न देता उलट सूडबुद्धीने निलंबन कारवाई केल्याच्या आरोपासह एका होमगार्ड सैनिकाने पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. ज्ञानेश्वर गजानन गोखे असे त्या होमगार्डचे नाव आहे. गोखे यांच्या मते, गत २००८ पासून ते होमगार्ड विभागात कार्यरत होते. दरम्यान २०१४ मध्ये त्यांना पोलीस भरतीची माहिती मिळाली. त्यात आरक्षण प्राप्त करण्यासाठी गोखे यांनी होमगार्डचे जिल्हा समादेशक अनिल आदमने यांच्याकडे तीन वर्षांचे अनुभव प्रमाणपत्रासाठी मागणी केली. परंतु त्यासाठी आदमने यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा गोखे यांनी आरोप केला आहे. गोखे यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने त्यांनी पाच हजार रुपयांची लाच देण्यास असमर्थता दर्शविली. त्यावर आदमने यांनी गोखे यांची परेड व कर्तव्य कमी असल्याचे कारण पुढे करू न त्यांना प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. शिवाय त्यांच्याविरुद्ध सूडबुद्धीने निलंबनाची कारवाई करू न त्यांना सेवेतून कमी केले. या घटनाक्रमानंतर रोजगार संघाचे अध्यक्ष संजय नाथे यांनी माहितीच्या अधिकारात होमगार्ड विभागाकडून मागितलेल्या माहितीतून अनेक धक्कादायक माहिती पुढे आली. गोखे यांनी १२२ कवायतीपैकी केवळ २५ कवायती केल्याचे सांगून त्यांना प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. परंतु माहितीच्या अधिकारात गोखे ५२ कवायतींना हजर असल्याचे स्वत: होमगार्ड विभागाने सांगितले. यावरू न आदमने यांनी केवळ लाच न मिळाल्यामुळे गोखे यांना प्रमाणपत्र दिले नसल्याचे दिसून येते. याशिवाय जिल्हा समादेशक आदमने यांनी नवीन होमगार्डची भरती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचाही पोलीस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीत गोखे यांनी उल्लेख केला आहे. यात आदमने यांच्यासह तालुका समादेशक मासूरकर सुद्धा सहभागी असल्याचे सांगितले आहे. तरी आपल्या विरूद्ध करण्यात आलेली निलंबन कारवाई मागे घेऊन पोलीस भरतीत सहभागी होण्यासाठी तीन वर्षांचे अनुभव प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी होमगार्ड गोखे यांनी पोलीस आयुक्तांना विनंती केली आहे. (प्रतिनिधी)सोनेगावात जखमी इसमाचा मृत्यूनागपूर : सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ जूनला सकाळी ८ वाजता आरोपी सतीश गोपाळराव महाकाळकर (वय ३७, रा. खापरी) याने एका इसमाला जबर धडक मारली होती. गंभीर जखमी झालेल्या या व्यक्तीला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना या व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र, त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. (प्रतिनिधी)सोनेगाव पोलिसांनी आरोपी सतीशविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहे.