शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

चहापानावरील विरोधकांच्या बहिष्काराबाबत 'सस्पेन्स' कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 21:04 IST

सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांतर्फे आयोजित चहापानाला उपस्थिती लावण्याबाबत विरोधकांची अद्याप भूमिका स्पष्ट झालेली नाही.

ठळक मुद्देरविवारी बैठकीत निर्णय होणार : भाजपाचे बहुतांश आमदार न जाण्याच्या भूमिकेत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांतर्फे आयोजित चहापानाला उपस्थिती लावण्याबाबत विरोधकांची अद्याप भूमिका स्पष्ट झालेली नाही. या चहापानाला जाण्यासंदर्भात बहुतांश भाजपा आमदार तयार नाहीत. तरीदेखील अंतिम निर्णय हा रविवारी सकाळी ११ वाजता नागपुरात होणाऱ्या बैठकीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.परंपरेनुसार मुख्यमंत्री अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी व विरोधकांना चहापानासाठी आमंत्रित करतात. साधारणत: विरोधकांकडून सरकार समस्यांप्रति गंभीर नसल्याचा आरोप करत यावर बहिष्कार टाकण्यात येतो. यंदा उद्धव ठाकरे यांचे हे मुख्यमंत्री म्हणून पहिलेच अधिवेशन राहणार आहे. त्यांनी रविवारी सायंकाळी ५ वाजता ‘रामगिरी’ येथे विरोधकांना चहापानासाठी निमंत्रित केले आहे. यासंदर्भात भाजपाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश भाजप आमदार हे शिवसेनेपासून नारज आहे. त्यामुळे चहापानाला जाऊ नये असे त्यांचे मत आहे. तर पक्षाचे धुरिण महाविकास आघाडी सरकारला काही वेळ देण्याच्या बाजूने आहेत. भविष्यात शिवसेनेसोबत परत चांगले संबंध होण्याची तसेच राष्ट्रवादीचे सहकार्य मिळण्याची शक्यता संपलेली नसल्याचे काही नेत्यांचे मानणे आहे. त्यामुळे चहापानाला उपस्थित राहून ते सकारात्मक संदेश देऊ इच्छितात. त्यामुळे रविवारच्या बैठकीवर सर्वकाही निर्भर राहणार आहे.अद्याप अंतिम निर्णय नाही : फडणवीसयासंदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संपर्क केला असता अद्यापपर्यंत चहापानाबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रविवारच्या बैठकीत आमदारांचे मत लक्षात घेऊन याबाबत आम्ही भूमिका ठरवू, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर