शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
2
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
4
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
5
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
6
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
7
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
8
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
9
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
10
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
11
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन
12
पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार
13
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
14
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
15
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
16
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
17
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
18
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
19
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
20
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"

ताडोबातील शिकारी वाघाचा गोरेवाड्यात संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 10:35 IST

११ जूनला केटी-१ हा वाघ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या कोलारा गावाजवळून पकडून गोरेवाडातील रेस्क्यू सेंटरमध्ये आणले होते. अतिशय धष्टपुष्ट असलेला हा वाघ २२ जूनच्या सकाळी पिंजऱ्यामध्ये निपचित पडलेला दिसला.

ठळक मुद्दे शरीरावर जखमा नाहीत, अहवालाची प्रतीक्षासर्पदंशाची शंका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोरेवाडा येथील रेस्क्यू सेंटरमध्ये सोमवारी सकाळी केटी-१ हा वाघ मृतावस्थेत आढळला. पाच व्यक्तींचा बळी घेणारा हा वाघ ११ जूनपासून या ठिकाणी ठेवण्यात आला आहे. त्याच्या अकस्मात मृत्यूने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.अडीच ते तीन वर्षे वयाचा हा वाघ चांगलाच धष्टपुष्ट होता. ११ जूनला त्याला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या कोलारा गावाजवळून पकडून गोरेवाडातील रेस्क्यू सेंटरमध्ये आणले होते. सुरुवातीचे तीन दिवस त्याने काहीच खाल्ले नव्हते. त्यानंतर तो खायला लागला होता. अतिशय धष्टपुष्ट असलेला हा वाघ २२ जूनच्या सकाळी पिंजऱ्यामध्ये निपचित पडलेला दिसला. तो हालचाल करीत नसल्याचे पाहून कर्मचाऱ्यांनी याची सूचना वरिष्ठांना दिली. तपासणीनंतर तो मृत झालेला आढळला. त्याच्या आकस्मिक मृत्यूने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. सर्पदंशामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र त्याच्या शरीरावर सर्पदंशाच्या कोणत्याही जखमा नसल्याने मृत्यूचे गूढ कायम आहे. शवविच्छेदनानंतर त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याच्या अहवालानंतरच खरे काय ते स्पष्ट होऊ शकेल. ताडोबा-अंधारी व्याघ्र परिसरातील कोलाराजवळील करबडा, मदनापूर, देवरी, सातारा, बामनगाव या परिसरात त्याचा वावर होता. या परिसरातील गावकऱ्यांवर हल्ला करून त्याने पाच जणांना ठार केले होते. त्यामुळे परिसरात त्याची दहशत होती. शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांनी शेतावर जाणेही बंद केले होते. कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शोध घेतला असता व्याघ्रहल्ल्याच्या पाचही घटनांमध्ये केटी-१ या वाघाची उपस्थिती स्पष्ट झाली.

टॅग्स :Tigerवाघ