शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विदेशींना भारतातील व्याघ्र अभयारण्यांना भेट न देण्याचे आवाहन करणाऱ्या सर्व्हायव्हल इंटरनॅशनलचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 21:28 IST

विदेशी पर्यटकांनी भारतातील व्याघ्र अभयारण्यांना भेट देऊ नये, असे धक्कादायक आवाहन करणाऱ्या सर्व्हायव्हल इंटरनॅशनल या लंडनमधील संघटनेचा व संघटनेचे संचालक स्टीफन कॉरी यांचा पेंचमधील गाईडस् व एनएनटीआर यांनी गुरुवारी निषेध केला.

ठळक मुद्देसातपुडा फाऊंडेशनने ई-मेल आणला उघडकीसपेंचमधील गाईडस् व एनएनटीआर यांनी केला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदेशी पर्यटकांनी भारतातील व्याघ्र अभयारण्यांना भेट देऊ नये, असे धक्कादायक आवाहन करणाऱ्या सर्व्हायव्हल इंटरनॅशनल या लंडनमधील संघटनेचा व संघटनेचे संचालक स्टीफन कॉरी यांचा पेंचमधील गाईडस् व एनएनटीआर यांनी गुरुवारी निषेध केला.संघटनेने विदेशी पर्यटकांना उद्देशून एक ई-मेल लिहिला आहे. भारत सरकार आदिवासींना वनांमधून हाकलून लावत आहेत. आदिवासींचे मूळ निवासस्थान वने आहेत. ते वनांची काळजी घेतात. परंतु, आता अनेक वने व्याघ्र अभयारण्य घोषित करण्यात आल्यामुळे आदिवासींना बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. तसेच, वाघ पाहण्यासाठी वनांमध्ये पर्यटकांच्या हजारो वाहनांना सोडले जाते. त्यामुळे वाघांचे जनजीवन प्रभावित होते व वनातील प्रदूषणाची पातळी वाढते. परिणामी विदेशी पर्यटकांनी भारतीय व्याघ्र अभयारण्यात जाऊ नये असे संघटनेने म्हटले आहे. आदिवासी विकासाकरिता कार्य करणाऱ्या सातपुडा फाऊंडेशन संस्थेने हा ई-मेल उघडकीस आणला.इको डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष बंडू उईके यांनी संघटनेला अशा प्रकारचे आवाहन करण्याचा अधिकार कुणी दिला असा प्रश्न निषेध बैठकीत बोलताना उपस्थित केला. सातपुडा फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे यांनी हे भारताविरुद्धचे अभियान असल्याचा आरोप केला. एनएनटीआरचे मुकुंद धुर्वे, सातपुडा फाऊंडेशनचे सहायक संचालक अभिजित दत्ता आदींनीही सर्व्हायव्हल इंटरनॅशनलवर निशाणा साधला.

टॅग्स :Tigerवाघnagpurनागपूर