शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

पारडी, भरतवाडा, पुनापूरचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण

By admin | Updated: April 17, 2017 02:46 IST

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या क्षेत्राधिष्ठित विकासासाठी निवड करण्यात आलेल्या पारडी, भरतवाडा, पुनापूरच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्प : नियोजनबद्ध विकास होणार नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या क्षेत्राधिष्ठित विकासासाठी निवड करण्यात आलेल्या पारडी, भरतवाडा, पुनापूरच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे हे सर्वेक्षण यूएव्ही ड्रोनद्वारे करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाच्या आधारावर संबंधित परिसराच्या विकासाचा आराखडा तयार केला जाईल. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत क्षेत्राधिष्ठित विकासाकरिता पारडी-भरतवाडा-पुनापूर या भागाची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी या भागामध्ये विकास आराखड्यातील तरतुदीनुसार विकास करण्यासाठी निर्बंध असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झालीत. यामुळे या भागाचा नियोजनबद्ध विकास होऊ शकला नाही. पारडी-भरतवाडा-पुनापूरप्रमाणे नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर ना-विकास क्षेत्रात (हरितपट्ट्यात) अनधिकृत अभिन्यास (ले-आऊट) तयार करून जमीनमालकांनी जमिनीची विल्हेवाट लावली. अधिकृत इमारतींमध्ये ज्या व्यक्तींना घर घेणे परवडत नाही अशा व्यक्तींनी ५०० ते १००० चौरस फुटांचे छोटे प्लॉट विकत घेऊन त्यावर महानगरपालिका अथवा नासुप्रची कोणती परवानगी न घेता बांधकामे केली आहेत. गुंठेवारी अधिनियमनान्वये यापैकी काही बांधकामे नियमितदेखील झालीत. तथापि, अशा भागांमध्येदेखील रस्ते, पिण्याचे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, शाळा, दवाखाने, क्रीडांगण व मनोरंजनाची साधने उपलब्ध झालेली नाहीत. नियोजनातील या त्रुटी लक्षात घेऊन शहराच्या विविध अविकसित भागांचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास करण्यासाठी रिट्रो फिटिंग तत्त्वावर नगर रचना परियोजना राबविण्याचा निर्णय स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत महापालिकेने घेतला. त्यानुसार क्षेत्राधिष्ठित विकास करण्यासाठी जाणीवपूर्वक पारडी, भरतवाडा व पुनापूर या अतिमागास भागांची निवड करण्यात आली. आता त्याचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून नगर रचना परियोजना तयार करण्याचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, लकडगंज झोन सभापती दीपक वाडीभस्मे, नगरसेवक मनीषा अतकरे, वैशाली वैद्य, जयश्री रारोकर, राजकुमार शेलोकर, सहायक आयुक्त सुभाष जयदेव, बबलफ्लाय टेक्नॉलॉजीस प्रा.लि.चे टेक्नो कमर्शियल मॅनेजर अमरदीप सिंग उपस्थित होते. याअंतर्गत मे. बबलफ्लाय टेक्नॉलॉजीस प्रा. लि. या कंपनीच्या माध्यमातून यूएव्ही ड्रोनने सर्वेक्षण सुरू करण्यात आले. यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून रीतसर परवानगी घेण्यात आली. पुढील १० दिवसांत सुमारे ९५१ एकर क्षेत्रातील इमारती व मोकळ्या जागांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येईल. एचसीपी अहमदाबाद या कंपनीमार्फत नगर रचना परियोजना तयार करण्यात येणार आहे. ड्रोन सर्वेक्षणामुळे प्रकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेला गती प्राप्त होणार असून, ही प्रक्रिया अधिकाधिक अचूक होण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)